Pune Police | पुण्याच्या कोंढाव्यातील ‘रेश्मा’वर ‘एमपीडीए’ची कारवाई; प्रथमच सराईत महिलेला स्थानबद्ध करुन येरवडा जेलमध्ये पाठवलं

पुणे : Pune Police | कोंढवा परिसरात गुन्हेगारी कृत्य करणार्‍या सराईत महिला गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. रेश्मा बापू भालशंकर (वय 45, रा. कोंढवा खुर्द, सध्या रा. अंतुलेनगर, येवलेवाडी) असे या महिलेचे नाव आहे. महिला गुन्हेगारावर प्रथमच एमपीडीए अन्वये कारवाई करुन स्थानबद्ध (Pune Police) करण्यात आले आहे.

रेश्मा भालशंकर ही पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. तिने आपल्या साथीदारांसोबत मिळून कोंढवा परिसरात गरीब व गरजू लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेत खंडणी, फसवणूक, घराविषयक आगळीक, दंगा असे गंभीर गुन्हे केले आहेत. गेल्या 3 वर्षात तिच्याविरुद्ध 4 गुन्हे दाखल आहेत. भालशंकर या महिलेची परिसरात दहशत आहे. त्यामुळे तिच्या गुन्हेगारी कृत्यामुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली होती. तसेच संबंधित महिला लोकांना सरकारी जमीन कोणत्याही सरकारी कागदपत्रांशिवाय विक्री करुन स्वत:चा आर्थिक फायदा करुन घेण्याच्या उद्देशाने फसवणूक करत होती.

कोंढवा पोलीस ठाण्याचे (Kondhwa Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील (Senior Police Inspector Sardar Patil) यांनी एमपीडीए कायद्यान्वये (MPDA Act) स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करुन पोलीस आयुक्तांकडे सादर केला होता. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन रेश्मा भालशंकर या गुन्हेगार महिलेला 1 वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

पोलीस आयुक्त अमिताभा गुप्ता यांनी गेल्या 11 महिन्यात तब्बल 35 गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करुन त्यांना स्थानबद्ध केले आहे.

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | मुख्यमंत्री ठाकरेंशी बंद दाराआड झालेल्या चर्चेबाबत फडणवीसांनी केला खुलासा, म्हणाले…

Pune Farmer Suicide | पुणे जिल्ह्यात शेतकर्‍याची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये अजित पवारांना निवेदन दिल्याचा उल्लेख

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Police | CP amitabh gupta action under MPDA act on lady criminal of kondhwa area,

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update