Pune Police CP Amitabh Gupta | गुन्हेगारांमध्ये पोलिसांची दहशत आवश्यक, नवनियुक्त उपायुक्तांना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांचा कानमंत्र

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कायदा सुव्यवस्था (Law and Order) अबाधित राहण्यासाठी गुन्हेगारांमध्ये पोलिसांची दहशत (Police Terror) कायम असली पाहिजे. यासाठी प्रत्येक झोन प्रमुखांनी त्यांच्या हद्दीतील टोळ्या, भाईगिरी-दादागिरी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे प्लॅनिंग करावे, अशा सुचना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune Police CP Amitabh Gupta) यांनी सर्व उपायुक्तांना दिल्या आहेत. तसेच महिला सुरक्षितता, वाहतूक कोंडी (Traffic Jam) सोडवणे, खासगी सावकारीला (Private Money Lender) आळा, बीट मार्शलिगं वाढवणे, हद्दीत शांतता ठेवण्यासाठी प्रत्येक झोन प्रमुंखांनी लक्ष द्यावे, असा कानमंत्र पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune Police CP Amitabh Gupta) यांनी नवनियुक्त उपायुक्तांना (DCP) दिला.

पुणे पोलीस आयुक्तालयात (Pune Police Commissionerate) आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune Police CP Amitabh Gupta) बोलत होते. यावेळी सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Jt CP Joint Sandeep Karnik), पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल (DCP Sandeep Singh Gill), स्मार्तना पाटील (DCP Smartana Patil), सुहेल शर्मा (DCP Suhail Sharma), शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate), विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh), अमोल झेंडे (DCP Amol Zende), विजय मगर (DCP Vijay Magar), श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge) उपस्थित होते.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव कटिबद्ध आहोत. दादागिरी, गुंडगिरी करणाऱ्या गुन्हेगारांचे रेकॉर्ड (Criminal Record) तयार करुन त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. कोणाचाही मुलाहिजा न ठेवात गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी प्राधान्य द्यावे. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये महिलांनी दाखल केलेले अर्ज पेंडिंग न ठेवता त्यावर तातडीने कारवाई करावी, अशा सूचना अमिताभ गुप्ता यांनी दिल्या.

मागील काही दिवसांपासून सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना चोरटे लक्ष्य करत आहेत.
त्यापार्श्वभूमीवर हद्दीमध्ये बीट मार्शलिंग वाढवावे, साध्या वेशातील पोलीस कर्मचारी अधिकारी तैनात करावेत.
ज्येष्ठ नागरिकांची होणारी फसवणुक, लुटमार थांबवण्यासाठी प्राधान्य द्यावे असेही आदेश अमिताभ गुप्ता
यांनी नवनियुक्त पोलीस उपायुक्तांना दिले.

पुण्यातील वाहतूक कोंडी संदर्भात बोलताना गुप्ता म्हणाले, वाहतूक नियमन करण्यासाठी पोलीस स्टेशन
स्तरावरील अधिकाऱ्यांसह वाहतूक अधिकाऱ्यांनी समन्वयाने नियोजन केले पाहिजे.
तसेच मुख्य चौकात आणि मध्यवर्ती ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी टाळण्याची जबाबदारी ही उपायुक्तांवर
सोपण्यात आली आहे. विशेषकरुन शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत उपाय कराव्यात.
वाहतूक निमयमनासाठी संबंधित उपायुक्तांनी विशेष लक्ष ठेवावे असे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले.

Web Title :- Pune Police CP Amitabh Gupta | police commisioner amitabh gupta meeting with police deputy commisioner

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Eknath Khadse | एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात पुन्हा एकदा खडाजंगी, जाणून घ्या कारण

Live-in-relationship | लिव्ह-इनमध्ये राहूनही ‘हे’ स्टार्स एकत्र राहू शकले नाहीत, एका वेदनादायक वळणावर तुटले नाते

Nana Patole | ‘राहुल गांधी यांच्या यात्रेमुळे देशात परिवर्तनाची लाट’ – नाना पटोले