Pune Police Cricket Tournament | पुणे शहर पोलीस क्रिकेट स्पर्धेत लोणी काळभोर पोलीस ठाण्याला विजेतेपद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहर पोलिसांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या फुल पिच टेनिस क्रिकेट स्पर्धेत (Pune Police Cricket Tournament) लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या (Loni Kalbhor Police Station) संघाने विजेतेपद पटकावले आहे. पुणे शहर पोलिसांच्या वतीने गुरुवारी (दि.29) थेऊर ग्रामपंचायत (Gram Panchayat) येथे क्रिकेट स्पर्धेचे (Pune Police Cricket Tournament) आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 32 संघांनी सहभाग घेतला होता.

 

पुणे शहर पोलिसांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये (Cricket Tournament) लोणी काळभोर पोलीस स्टेशन आणि कुंजीरवाडी (Kunjirwadi) या दोन संघात अंतिम सामना झाला. लोणी काळभोर संघाने कुंजीरवाडी संघाचा पराभव करुन पहिल्या क्रमांकाचे पारितोषीक पटकावले. विजेत्या संघाला सन्मानचिन्ह व रोख रक्कम 55 हजार रुपये तर उपविजेत्या संघाला सन्मानचिन्ह व रोख रक्कम 44 हजार रुपये बक्षीस देण्यात आले.

 

 

या स्पर्धेमध्ये लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi) यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने सहभाग घेतला होता.

लोणी काळभोर क्रिकेट संघ

पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस नाईक प्रशांत गायकवाड, प्रशांत कळसकर, गणेश भापकर, अजिंक्य जोजारे, संदीप धुमाळ, प्रशांत सुतार, वसंत चव्हाण, समीर काकडे (सर्व लोणी काळभोर पोलीस स्टेशन), अमर साळवे (वानवडी पोलीस स्टेशन -Wanwadi Police Station), नाना सोडनवर (मुंढवा पोलीस स्टेशन-Mundhwa Police Station), प्रदीप न्यायनीत (खडक पोलीस स्टेशन-Khadak Police Station) या संघाने सहभाग घेतला होता.

 

 

Web Title :- Pune Police Cricket Tournament | Loni Kalbhor Police Station wins Pune City Police Cricket Tournament

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Price Today | सोने-चांदी खरेदीदारांसाठी खुशखबर ! सोने सर्वोच्च स्तरापासून 9512 रुपये स्वस्त

 

Rashifal 2022 | नवीन वर्ष 2022 मध्ये पहिल्या दिवसापासून कोणत्या 3 राशींवर राहिल शनीचा चांगला ‘प्रभाव’; जाणून घ्या

 

MPSC विरुद्ध लिहाल तर काही परीक्षेला बसण्यास मज्जाव करण्यात येईल, आयोगाचा विद्यार्थ्यांना इशारा; विद्यार्थ्यांकडून संताप

 

Post Office Saving Schemes | घरात मुल जन्माला येताच पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक, 5 वर्षात मुल होईल ‘लखपती’ !

 

Anti Corruption Bureau Pune | 85 हजार रुपयांची लाच घेताना खासगी इसम अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात; चाकण पोलिस ठाण्यातील PSI सह दोघांवर गुन्हा

 

Employees Pension Scheme | 300% पर्यंत वाढू शकते पेन्शन ! 7500 रुपयांवरून वाढून 25000 रुपये होईल पेन्शन, जाणून घ्या गणित