Pune Police Crime Branch | पुण्यातील व्यापार्‍याकडे 2 लाखाच्या खंडणीची मागणी; हॉटेल ‘हयात रिजेन्सी’ मध्ये विशाल उर्फ जंगल्या सातपुतेसह तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Crime Branch | आपल्या टोळीचा पुण्यात जम बसविण्यासाठी टिंबर मार्केटमधील (timber market) व्यापार्‍याला २ लाख रुपयांची खंडणी मागून ती घेण्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये आलेल्या तिघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhre) आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून (Pune Police Crime Branch) पकडले.

विशाल ऊर्फ जंगल्या शाम सातपुते Vishal alias Jangalya Sham Satpute (वय ३२, रा. पीएमसी कॉलनी, घोरपडे पेठ), मंगेश शाम सातपुते (वय ३६) आणि अक्षय दत्तात्रय भालेराव (वय २६, रा. भेकराईनगर, हडपसर) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

याप्रकरणी बिबवेवाडी (Bibvewadi) येथील एका ४६ वर्षाच्या व्यापार्‍याने येरवडा पोलीस ठाण्यात Yerwada Police Station (गु. र. नं. ५११/२१) गुन्हा दाखल केला आहे. विशाल ऊर्फ जंगल्या श्याम सातपुते याच्यावर खुन, खुनाचा प्रयत्न, दरोड्याची तयारी असे विविध ४ गुन्हे दाखल आहेत. तो सध्या जामिनावर बाहेर आला आहे. विशाल सातपुते व त्याच्या टोळीतील ६ जण अशा ७ जणांना पुणे पोलिसांनी (Pune Police Crime Branch) गुन्हा वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पकडले होते. त्यांच्याकडून पिस्तुल, काडतुसे आणि कोयते असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता.

जंगल्या सातपुते हा गेल्या काही दिवसांपासून फिर्यादी यांना सतत फोन करुन मी पुण्यातील भाई असून माझी पुण्यामध्ये टोळी आहे. मला माझ्या टोळीचा पुणे शहरात जम बसवायचा आहे, तू मला ओळखत नाही का. तुला टिंबर मार्केटमध्ये धंदा करावयाचा असेल तर मला २ लाख रुपये दे. जर पैसे दिले नाही तर तुला संपवून टाकेन, अशी धमकी देऊन खंडणीची मागणी करीत होता. या व्यापार्‍याने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली. त्यानंतर पैसे घेण्यासाठी या गुंडांना विमाननगर (Viman Nagar) येथील हॉटेल हयात रिजेन्सी (hyatt regency pune) येथे बुधवारी सायंकाळी बोलविण्यात आले होते. पोलिसांनी सापळा रचला होता. फिर्यादीकडून या गुडांनी १ लाख रुपये स्वीकारली असताना पोलिसांनी त्या तिघांना रंगेहाथ पकडले. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Police Crime Branch | 2 lakh ransom demand from Pune businessman; Three arrested, including Vishal alias Jangalya Satpute, at Hotel Hyatt Regency

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Corporator Archana Tushar Patil | आता सुरु होणार पुणे महापालिकेतर्फे सावित्रीबाई फुले शैक्षणिक पुरस्कार ! नगरसेविका अर्चना पाटील यांच्या मागणीला यश

Parenting Tips | जिद्दी मुलांना आणखी आडमुठे बनवतील तुमच्या ‘या’ चुका, जाणून घ्या 7 पर्याय आणि मुलांना समजवा

Pune Police Crime Branch | ‘मोक्का’ गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक