Pune Police Crime Branch | कोकेन बाळगणाऱ्या 2 नायजेरियन नागरिकांना अटक, 2 लाखाचे कोकेन जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोकेन अमली पदार्थ बाळगणाऱ्या दोन नायजेरियन नागरिकांना पुणे गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अमली पदार्थ विरोधी पथक (Anti Narcotics Cell) एकच्या पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या नायजेरियन (Nigerian) नागरिकांकडून 2 लाख 17 हजार 800 रुपये किमतीचे 10 ग्रॅम 890 मिलीग्रॅम कोकेन (Cocaine) जप्त करण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिसांनी ही कारवाई चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या (Chaturshrungi Police Station) हद्दीत बुधवारी (दि.29) केली.

नंन्दी ओडीनका हेनरी Nnadi Odinaka Henry (वय-37), ओकेके इन्फीचिकु जॉन Okeke Infechukwu John (वय-29 दोघे रा. श्रीहरी अपार्टमेंट, लक्ष्मी देवकर पार्क जवळ, पिंपळे गुरव, मु. रा. नायजेरिया) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
अमली पदार्थ विरोधी पथक एकचे पोलीस चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते त्यावेळी युनर्व्हसिटी गेट समोरील सार्वजनिक रोडवरील फुटपाथवर दोन नायजेरियन नागरिक थांबले होते. पोलिसांना संशय आल्याने त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ 10 ग्रॅम 890 मिली ग्रॅम कोकेन आढळून आले.

आरोपींकडून दोन दुचाकी, 5 मोबाईल, कोकेन असा एकूण 2 लाख 80 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
त्यांच्याविरुद्ध चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला (Pune Police Crime Branch) आहे.
सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे (API Laxman Dhengale) यांनी सरकारच्या वतीने फिर्याद दिली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे लामतुरे (Police Inspector Lamture) करीत आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), अपर पोलीस आयुक्त गुन्हे (अति कार्यभार) भाग्यश्री नवटके (IPS Bhagyashree Navatke),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 (अति कार्यभार) लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Police Inspector Vinayak Gaikwad), सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे,
पोलीस अंमलदार सुजित वाडेकर, मारुती पारधी, मनोज साळुंके, चेतन गायकवाड, संदीप जाधव, राहुल जोशी, विशाल दळवी, विशाल शिंदे, रेहना शेख,
संदेश काकडे, योगेश मोहिते यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Pune Police Crime Branch | 2 Nigerian nationals arrested for possession of cocaine

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 111 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Maharashtra College Reopen | राज्यातील महाविद्यालये दिवाळीनंतरच सुरु करण्याचा विचार, उदय सामंत यांची माहिती

Baramati Bus Stand | बारामतीत होणार राज्यातील सर्वात अत्याधुनिक बसस्थानक