Pune Police Crime Branch | 10 लाखांचे चरस विक्रीसाठी आलेल्या तस्कराला अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रेल्वेने हरियानातून (Haryana) पुण्यात चरस विक्रीसाठी (charas seized) आलेल्या तस्कराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली विरोधी पथकाने (Anti-drug squad) अटक (Arrest) केली आहे. पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Pune Police Crime Branch) अटक करण्यात आलेल्या तस्कराकडून 10 लाख 10 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.17) सायंकाळी सहाच्या सुमारास खडकी बाजार बसस्टँड (Khadki Bazaar Bus Stand) समोरील सार्वजनिक रोडवर केली.

विकास बबरसिंह इटकान (Vikas Babarsingh Itkan) (वय-22 रा. हाऊस नं. 1109 ए, वॉर्ड नं. 10, भारतनगर, हिंसार हरीयाणा) असे अटक करण्यात आलेल्या तस्कराचे नाव आहे. आरोपीकडून 1 किलो चरस आणि मोबाईल, रोख रक्कम असा 10 लाखाचा ऐवज जप्त केला आहे.

अमली पदार्थ विरोधी पथक एकचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Police Inspector Vinayak Gaikwad) स्टाफसह हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी खडकी बाजार येथे एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरत असल्याचे दिसून आले. त्याच्याकडे असलेल्या सॅकमध्ये 10 लाख रुपये किमतीचे एक किलो चरस मिळून आला. आरोपी विरोधात खडकी पोलीस ठाण्यात (Khadki police station) एनडीपिएस अ‍ॅक्ट (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे (API Laxman Dhengale) करीत आहेत.

ही कारवाई पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune Police Commissioner Amitabh Gupta),
सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint Commissioner of Police, Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे (Additional Commissioner of Police Ashok Morale),
पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (Deputy Commissioner of Police Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख (Assistant Commissioner of Police Surendra Deshmukh)
यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक 1 पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार सुजित वाडेकर, संदिप जाधव, राहुल जोशी, विशाल दळवी, पांडुरंग पवार, प्रविण उत्तेकर, विशाल शिंदे, संदेश काकडे, रेहना शेख, नितेश जाधव, योगेश मोहिते यांनी केली.

Web Title :- Pune Police Crime Branch arrest criminal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Modi | PM मोदींना कपिल देव म्हणाले – ‘तुम्ही क्रीडा जगतातचे हृदय जिंकले’, पंतप्रधानांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 5,132 नवीन रुग्ण, 8,196 रुग्णांना डिस्चार्ज

Satara Crime | मेहुण्यानेच केला भावोजीचा खून? सातारा जिल्ह्यात खळबळ