Pune Police Crime Branch | ज्लेलर्सच्या दुकानातून हातचलाखीने अंगठ्या चोरणारी ‘बबली’ गुन्हे शाखेच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील ज्लेलर्सच्या दुकानातून हतचलाखीने सोन्याच्या अंगठ्या चोरणाऱ्या महिलेला पुणे गुन्हे शाखा युनिट (Pune Police Crime Branch) चारच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तिच्याकडून गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेने (Pune Police Crime Branch) ही कारवाई विश्रांतवाडी येथील बाआरटी बसस्टॉप (Vishrantwadi BRT bus stop) येथे केली. अपर्णा अजित ससाणे (रा. तुकाराम नगर, चंदननगर, खराडी) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

आरोपी महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या (Vishrantwadi Police Station) हद्दीतील पार्श्वनाथ ज्वेलर्स (Parshwanath Jewelers) येथे हातचलाखीने दोन सोन्याच्या अंगठ्या (Gold ring) चोरल्या होत्या. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना कैद झाली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शखा युनिट चार चे पोलीस अंमलदार राकेश खुणवे (Rakesh Khunve) व अशोक शेलार (Ashok Shelar) यांना ही महिला चंदनगर खराडी भागात राहात असल्याची माहिती मिळाली. तसेच ही महिला विश्रांतवाडी येथील बीआरटीएस बसस्टॉप येथे दुचाकीवर कोणाचीतरी वाट पाहत असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांना (Pune Police Crime Branch) सपाळा रचून आरपी महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडे सखोल चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी महिलेकडून 88 हजार रुपये किमतीच्या 19 ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या आणि गुन्ह्यात वापरलेली स्कुटर असा एकूण 1 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपासासाठी महिलेला विश्रांतवाडी पोलीस स्टशनच्या (Vishrantwadi Police Station) ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे भाग्यश्री नवटके (Additional Commissioner of Police Bhagyashree Navatke),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर (Senior Police Inspector Jayant Rajurkar),
सहायक पोलीस निरीक्षक शोभा क्षिरसागर (API Shobha Kshirsagar), पोलीस उप निरीक्षक जयदिप पाटील (PSI Jaideep Patil),
पोलीस अंमलदार महेंद्र पवार, राकेश खुणवे, अशोक शेलार, प्रविण भालचिम, दत्ता फुलसुंदर, विशाल शिर्के यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Police Crime Branch | Bubbly caught stealing thumbs from jewelers’ shop

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | वाहन चालकानं भर रस्त्यात 28 वर्षीय महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी, वानवडी परिसरात बिबवेवाडीमधील युवक ‘गोत्यात’

Ahmednagar Crime | शाळकरी विद्यार्थ्यांनी शिक्षिकेचे ‘कडक’ फोटो काढले, ‘मॉर्फ’ करून ‘अश्लील’ छायाचित्रे व्हायरल, अल्पवयीन पोरांचं ‘कांड’

Baal Aadhaar card | नवजात बालकाचं आधार कार्ड काढायचंय? तर मग बघा सोपी प्रक्रिया