Pune Police Crime Branch | पुण्यात बसमध्ये प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, 12 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये बसमधून प्रवास करणाऱ्या महिला आणि पुरषाला हेरून त्याच्या भोवती गर्दी करुन किमती सामान, दागिने चोरणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 1 ने (Pune Police Crime Branch) पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) पोलिसांनी 2 महिलांसह 6 जणांना अटक करुन 10 गुन्हे उघडकीस आणले आहे. या कारवाईत पोलिसांनी 12 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अरुण शिवाजी गायकवाड (वय-38 रा. आनंदनगर, सर्वोदय कॉलनी, मुंढवा), मोहन गणेश जाधव (वय-30 रा. संभाजी चौक, केशवनगर, मुंढवा), शिवराज अर्जुन वाडेकर (वय-22 रा. भोलेनाथ मंदिराजवळ, मुंढवा), प्रशांत मिठु थोरबोले (वय-22 रा. घुले कॉलनी, मांजरी बुद्रुक), शितल श्रीनिवास वाडेकर (वय-29), भिमाबाई रमेश बजंत्री (वय-45 दोघी रा. भोलेनाथ मंदिराजवळ मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपीपैकी शितल वाडेकर ही सराईत गुन्हेगार असून तिच्यावर मुंढवा (Mundhwa Police Station), बंडगार्डन (Bundgarden Police Station), डेक्कन (Deccan Police Station), स्वारगेट (Swargate Police Station), बिबवेवाडी (Bibvewadi Police Station) व वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) 11 गुन्हे दाखल आहेत. तर मोहन जाधव याच्यावर मुंढवा पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.

बसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचे दागिने आणि पुरुषांच्या खिशातील पाकीट चोरीच्या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखा (Pune Police Crime Branch) युनिट 1 चे पोलीस अधिकारी कर्मचारी करीत होते. तपासादरम्यान आरोपींची माहिती माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराजवळ (Omkareshwar Temple) सापळा रचून दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून एक रिक्षा, कोयता, चॉपर, मिरची पुड, कटर तसेच गुन्ह्यात चोरलेले 180 ग्रॅम वजानाचे सोन्याचे दागिने (Gold jewelry), रोख रक्कम असा एकूण 12 लाख 28 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

 

अशी करत होते चोरी

अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलीस कोठडी घेऊन चौकशी करण्यात आली.
चौकशी दरम्यान आरोपी संगनमत करुन बसमध्ये प्रवास करुन बसमधील महिला व पुरुष प्रवाशांना हेरत होते.
त्यांच्याभोवती दाटीवाटी व गर्दी करुन खिशातील रक्कम व महिलांच्या जवळील पर्स, हातातील सोन्याच्या बांगड्या,
पाटल्या कटरने कट करुन चोरत असल्याचे उघडकीस आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr. Ravindra Shisve),
प्रभारी अपर पोलीस आयुक्त गुन्हे भाग्यश्री नवटके (IPS Bhagyashree Navatke),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Senior Police Inspector Shailesh Sankhe),
पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड (PSI Sanjay Gaikwad), सुनिल कुलकर्णी (PSI Sanil Kulkarni),
पोलीस अंमलदार सतीश भालेकर, दत्ता सोनावणे, अनिकेत बाबर, राहुल मखरे, विजेसिंग वसावे, महेश बामगुडे, इम्रान शेख, अजय थोरात, अमोल पवार, अशोक माने, अय्याज दड्डीकर, तुषार माळवदकर, मिना पिंजण, रुक्साना नदाफ यांनी केली.

Web Title :- Pune Police Crime Branch | Crime branch busts for stealing passengers’ jewelery in Pune bus, seizes Rs 12 lakh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil | ‘…तर विधानसभेला शिवसेनेच्या फक्त 5 जागा आल्या असत्या’

Amitabh Bachchan Caller Tune | कोविड-19 कॉलर ट्यूनने तुम्हाला थकवलेय का? जाणून घ्या तात्काळ बंद करण्याची प्रक्रिया

Maharashtra Rains | आगामी 4 ते 5 दिवस गडगडाटांसह जोरदार पावसाचा IMD चा इशारा