Pune Police Crime Branch | पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिकाला IT च्या चौकशीची धमकी, प्रकरण मिटवण्यासाठी 50 लाखाची खंडणी मागणाऱ्याला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Crime Branch | पुण्यातील एका प्रसिद्ध व्यावसायिकाच्या उद्योगसमूहाच्या एका कंपनीने घेतलेल्या कर्जामध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचा बनाव रचून आयकर विभागाची चौकशीची धमकी दिल्याचा प्रकार पुण्यात समोर आला आहे. एवढेच नाही तर आरोपींनी संनमत करुन हे प्रकरण मिटवण्यसाठी 50 लाख रुपयांची खंडणी (extortion) मागण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणातील एका आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) युनिट एकने बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई सहकारनगर नं .2 येथे केली.

रुपेश ज्ञानोबा चौधरी Rupesh Gyanoba Chaudhary (वय-46 रा. प्लॅट नं. बी/303, तिसरा मजला, पाटे संस्कृती, सहकारनगर नं. 2) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याचे साथिदार अमित मिरचंदानी (Amit Mirchandani), विकास भल्ला (Vikas Bhalla), संतोष राठोड (Santosh Rathod) व इतर आरोपींचा गुन्हे शाखेचे पोलीस शोध घेत आहेत. हा प्रकार शनिवार पेठेतील (shaniwar peth) अमिर मिरचंदानी च्या कार्यालयात 22 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता घडला आहे. याप्रकरणी 43 वर्षीय व्यावसायिकाने विश्रामबाग पोलिसांकडे (vishrambaug police station) फिर्याद दिली आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट एक करीत आहे.

आरोपी रुपेश चौधरी हा त्याच्या घरी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलीस अमलदारांना समजली. त्यानुसार पोलिसांनी सहकारनगर येथील त्याच्या घराजवळ पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. रुपेश याच्यावर यापूर्वी दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) खंडणीचा गुन्हा दाखल आहे. त्याला न्यायालयात हजर केले असतान न्यायालयाने 11 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Pune Police Crime Branch)

 

काय आहे प्रकरण ?

आरोपींनी संगनमत करुन फिर्यादीच्या ग्रुपमधील एका कंपनीने डी. एच. एल. एफ. (DHLF) यांच्याकडून घेतलेल्या 68 कोटीच्या कर्जात आर्थिक घोटाळा झाला आहे, असा बनाव रचला. त्या प्रकरणात आयकर विभागाने (Income Tax Department) हरकत घेतली असून त्यामुळे ईडी व एस एस आय ओ यांनी त्रुटी काढल्या आहेत, असे चित्र निर्माण केले. संतोष राठोड याने ईडीचे दिल्लीतील अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत. ते पुण्यात (Pune Crime) आलेले असून तुमची केस त्यांच्याकडे प्रलंबित आहे. ते प्रकरण मिटवून देतो, असे सांगितले. त्याला फिर्यादी नकार दिल्यावर रुपेश चौधरी याने फिर्याद यांना माझ्याकडे 200 मुलांची टीम आहे बघुन घेईन अशी धमकी दिली. त्या सर्वांनी प्रकरण मिटविण्यासाठी फिर्यादीकडे 50 लाख रुपयांची मागणी केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे भाग्यश्री नवटके (IPS Bhagyashree Navatke), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Senior Police Inspector Shailesh Sankhe), पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड (PSI Sanjay Gaikwad),
सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार सतीश भालेकर, दत्ता सोनावणे, राहुल मखरे, महेश बामगुडे, रुक्साना नदाफ यांनी केली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Police Crime Branch | Famous Pune businessman threatened by IT probe, Crime Branch arrested for demanding Rs 50 lakh ransom to clear case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Corona | ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 149 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corporation Elections | पतित पावन संघटनेचा ‘भाजप’ला धक्का ! पुणे महापालिका निवडणुक लढविण्याची घोषणा; जाणून घ्या भूमिका

IPS Transfer Maharashtra | हरीश बैजल सोलापूरचे नवे पोलिस आयुक्त ! पुण्याच्या गुन्हे शाखेत अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे यांची नियुक्ती