Pune Police Crime Branch | अपहरण व खंडणी गुन्ह्यातील फरार आरोपीला 2 वर्षांनी अटक, गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Crime Branch | अपहरण (Kidnapping) आणि खंडणी (ransom) गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला (criminal) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch ) खंडणी विरोधी पथक (Anti-ransom squad) एकच्या पोलिसांनी बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. खंडणी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र, तो पोलिसांना सापडत नव्हता. अखेर खंडणी विरोधी पथकाने (anti extortion cell) आरोपीला आज (रविवार) दोन वर्षांनी अटक केली आहे.

आदित्य रोहिदास साळुंके (वय -24 रा. साई सोनाई कॉम्प्लेक्स, शिंदे पुल, शिवणे, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी आदित्य साळुंके याच्यावर हवेली पोलीस ठाण्यात दोन वर्षापूर्वी अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार झाला होता. आरोपी वारजे येथील आंबेडकर चौकात येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकातील पोलीस नाईक नितीन रावळ (Nitin Rawal) आणि राजेंद्र लांडगे (Rajendra Landage) यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला सापळा रचून अटक केली. आरोपीला पुढील कार्यवाहीसाठी हवेली पोलीस ठाण्याच्या (Haveli Police Station) ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त श्रीनीवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे
-1 लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate), खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे
(Police Inspector Balaji Pandhare) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा
(API Sandeep Buva), पोलीस नाईक नितीन कांबळे, राजेंद्र लांडगे, नितीन रावळ, विवेक जाधव, प्रफुल्ल
चव्हाण, दुर्योधन गुरव, हनुमंत कांदे यांच्या पथकाने केली.

हे देखील वाचा

Chakan Crime | चाकण पोलिसांचा ‘व्हिडिओ गेम’ जुगार अड्ड्यावर छापा, 7 जणांवर FIR

PM Kisan Yojana | अर्जात ‘ही’ चूक करतात शेतकरी, दरवर्षी 6 हजार रुपये पाहिजेत तर जाणून घ्या अटी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Police Crime Branch | Fugitive accused in kidnapping and ransom case arrested after 2 years, Crime Branch action

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update