Pune Police Crime Branch | 10 वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणारा सराईत गुन्हे शाखेकडून गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  दरोड्याच्या गुन्ह्यात दहा वर्षापासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) दरोडा व वाहनचोरी विरोधीक पथक (Anti-robbery and anti-vehicle theft squad) एकने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी विरोधात अहमदनगर (Ahmednagar) येथील तोफखाना पोलीस ठाण्यात (tofkhana police station) 2011 मध्ये गुन्हे दाखल असून तो 10 वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत होता. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Pune Police Crime Branch) ही कारवाई नऱ्हे येथील पारी कंपनीजवळ केली.

राजु बाबुराव जावळकर (वय-55 रा. खानापुर गाव, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पथकातील पोलीस कोथरुड, वारजे माळवाडी व सिंहगड रोड परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस शिपाई श्रीकांत दगडे (Shrikant Dagde)
यांना 10 वर्षापासून फरार असलेला आरोपी नऱ्हे येथे येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीला सापळा रचून अटक केली.
त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याचा दरोड्याच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
पुढील कार्यवाहीसाठी आरोपीला अहमदनगर येथील तोफखाना पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे भाग्यश्री नवटके
(Additional Commissioner of Police Bhagyashree Navatke), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे(DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 लक्ष्मण बोराटे
(ACP Laxman Borate) यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे (Senior Police Inspector Anil Shewale),
सहायक पोलीस फौजदार शाहिद शेख, पोलीस हवालदार निलेश शिवतरे, पोलीस नाईक धनंजय ताजणे, गणेश पाटोळे, गणेश ढगे, मॅगी जाधव पोलीस अंमलदार श्रीकांत दगडे,
सुमित ताकपेरे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :  Pune Police Crime Branch | Gaitaad from Sarait Crime Branch, who has been harassing the police for 10 years

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Vaccination Certificate | काय सांगताय ! होय, आता दारुसाठीही लसीकरणाचे प्रमाणपत्र बंधणकारक; ‘या’ जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय

Sleeping Disorder | तुम्हाला सुद्धा अंथरूणावर पडताच येते का झोप? स्लीप डिसॉर्डरच्या ‘या’ लक्षणाकडे करू नका दुर्लक्ष

BJP MLA Sunil Kamble | आमदार सुनिल कांबळेंवर गुन्हा दाखल करा; पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे पोलिसांना निवेदन