Pune Police Crime Branch News | गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-1 कडून 3 सराईत गुन्हेगारांना अटक ! 2 पिस्तुलासह 4 जिवंत काडतुसे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Crime Branch News | पुणे शहर पोलिसांच्या (Pune City Police) गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथक-1 ने Anti Extortion Cell Pune (AEC Pune) खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीसह 3 सराईत गुन्हेगारांना मालधक्का चौकाकडून (Maldhakka Chowk) पुणे रेल्वे स्टेशनकडे (Pune Railway Station) जाणार्‍या रस्त्यावरून अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 देशी बनावटीचे पिस्तुल (Pistol Seized), 4 जिवंत काडतुसे आणि लोखंडी कोयता असा एकूण 80 हजार 700 रूपयाचा ऐवज जप्त केला आहे. (Pune Police Crime Branch News)

 

ओंकार उर्फ ओमा तानाजी लोखरे Omkar alias Oma Tanaji Lokhre (19, सध्या रा. जाधव हाईट्स, 2 रा मजला, रायकर मळा, धायरी), आकाश उर्फ सोन्या गणपत भिकुले Aakash alias Sonya Ganpat Bhikule (24, सध्या रा. नांदेड फाटा, महादेवनगर, ता. हवेली, जि. पुणे) आणि राधेमोहन उर्फ मुन्ना सिताराम पिसे Radhemohan Alias Munna Sitaram Pise (19, सध्या रा. यशोदीप चौक, वारजे माळवाडी, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Pune Police Crime Branch News)

 

याबाबत अधिक माहिती अशी की मंगळवारी (दि. 6 जून 2023) गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-1 मधील पोलिस अंमलदार अमोल आवाड आणि किरण ठवरे यांना एका सराईत गुन्हेगाराकडे देशी बनावटीचे पिस्तुल असून तो मध्यरात्री रेल्वेने परगावी जाणार असल्याची माहिती मिळाली होती. प्राप्त माहित पोलिस निरीक्षक अजय वाघमारे यांना सांगितल्यानंतर त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिल होते.

पोलिसांनी मालधक्का चौक ते पुणे रेल्वे स्टेशनकडे जाणार्‍या रस्त्यावर सापळा रचला. रेल्वे रूग्णालयाच्या समोर पोलिसांना 3 संशयित मिळून आले. त्यांना ताब्यात घेवून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून 2 देशी बनावटीचे पिस्तुल, 4 जिवंत काडतुसे आणि एक लोखंडी कोयता असा एकुण 80 हजार 700 रूपयाचा ऐवज मिळून आला. पोलिसांनी तो जप्त केला असून त्यांच्याविरूध्द बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये (Bundgarden Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

आरोपी ओंकार उर्फ ओमा तानाजी लोखरे हा सिंहगड रोड पोलिस स्टेशनच्या (Sinhagad Road Police Station) रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminals On Pune Police Record) असून त्याच्याविरूध्द 11 गुन्हे दाखल आहेत. तो एका खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयात पोलिसांना हवा होता. आरोपी आकाश उर्फ सोन्या गणपत भिकुले हा पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो देखील एका खुनाच्या प्रयत्नाच्या (Attempt To Kill) गुन्हयात पोलिसांना हवा होता. आरोपी राधेमोहन उर्फ मुन्ना सिताराम पिसे हा सिंहगड रोड पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द 6 गंभीर गुन्हयांची नोंद आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक-1 चे प्रमुख आणि पोलिस निरीक्षक अजय वाघमारे (PI Ajay Waghmare),
पोलिस उपनिरीक्षक विकास जाधव (PSI Vikas Jadhav),
पोलिस उपनिरीक्षक यशवंत ओंबासे (PSI Yashwant Ombase), पोलिस अंमलदार किरण ठवरे,
अमोल आवाड, सयाजी चव्हाण, हेमा ढेबे, प्रमोद सोनावणे, प्रफुल्ल चव्हाण, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, राजेंद्र लांडगे,
प्रविण ढमाळ, रविंद्र फुलपगारे आणि विजय कांबळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विकास जाधव करीत आहेत.

 

Web Title :  Pune Police Crime Branch News | Anti-extortion Cell-1 of Pune Police crime branch
arrested 3 inn criminals! 4 live cartridges recovered from 2 pistols

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा