Pune Police Crime Branch News | गुन्हे शाखेकडून बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगणार्‍याला बुधवार पेठेतून अटक; अग्नीशस्त्र जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Crime Branch News | पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील युनिट-1 च्या पथकाने बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगणार्‍याला बुधवार पेठेतून अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल जप्त (Pistol Seized) करण्यात आले आहे. त्याच्याविरूध्द फरासखाना पोलिस ठाण्यात (Faraskhana Police Station) आर्म्स अ‍ॅक्टनुसार (Arms Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Police Crime Branch News)

ओंकार रामप्रकाश अंभुरे Omkar Ramprakash Ambhure (21, रा. साक्षी अपार्टमेंट, तिसरा मजला, लेन नं. 12, गारमाळा धायरी गाव, पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अंभुरे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminal On Pune Police Records) आहे. शनिवारी पुणे पोलिसांच्या ऑल आऊट ऑपरेशनच्या (Pune Police All Out Operation) दरम्यान गुन्हेगारांची चेकिंग सुरू होती. गुन्हे शाखेतील युनिट-1 चे पथक फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोहिम राबवित असताना पोलिस अंमलदार दत्ता सोनवणे यांना आरोपी अंभुरे हा वेश्यागमनासाठी बुधावार पेठ परिसरात येणार असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचुन अंभुरेला अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 60 हजार रूपये किंमतीचे देशी बनावटीचे पिस्टल मिळून आले. पोलिसांनी ते अग्नीशस्त्र जप्त करून त्याच्याविरूध्द फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (Pune Police Crime Branch News)

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल तांबे (ACP Sunil Tambe) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सैय्यद (Sr PI Shabbir Sayyad), सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष कवठेकर (API Ashish Kavathekar), पोलिस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी (PSI Sunil Kulkarni), पोलिस उपनिरीक्षक अजय जाधव (PSI Ajay Jadhav), पोलिस अंमलदार दत्ता सोनवणे, राहुल मखरे, अमोल पवार, शशिकांत दरेकर, विठ्ठल साळुंखे, महेश बामगुडे आणि अभिनव लडकत यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title :   Pune Police Crime Branch News | Crime Branch Unit 1 Arrest Criminal who carry Illegal Pistol Budhwar Peth Area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पत्नीच्या भावानेच फसवलं ! सॉफ्टवेअर इंजिनिअरची 28 लाखाची घरातील समस्या दूर करण्याच्या नावाखाली फसवणूक

Maharashtra Cabinet Expansion | भाजपकडून पुन्हा धक्कातंत्र; मंत्रिमंडळातील चौघांना मिळणार डच्चू?, ‘या’ भागातील मंत्र्यांचा समावेश

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आजचा पुण्यातील दर काय? जाणून घ्या

Weekly Horoscope (10-16 July) : हा आठवडा सर्वांसाठी कसा असेल, वाचा १२ राशींचे साप्ताहिक राशिफळ

Depression | ‘या’ बियांच्या सेवनाने दूर होईल तुमचे ‘डिप्रेशन’, जाणून घ्या त्याचे फायदे