Pune Police Crime Branch News : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून दरोडेखोरांवर गोळीबार, एक पोलीस जखमी (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Crime Branch News : शहरात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली असताना वारजेत (Warje Malwadi) कोबिंग ऑपरेशन करणार्‍या गुन्हे शाखेचे पथक आणि ८ ते १० दरोडेखोरांमध्ये धुम्रचक्री उडाली. दरोडेखोरांनी गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कोयता फेकून मारल्याने त्यात पोलीस कर्मचारी जखमी झाला असून त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी पोलिसांनीही दरोडेखोरांवर गोळीबार केला. पळून जाणार्‍या ५ दरोडेखोरांना पोलिसांनी पकडले. (Pune Police Crime Branch News)

 

 

स्टेट बँकेच्या एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत हे दरोडेखोर होते. ही घटना वारजे येथील रोजरी स्कुलजवळील म्हाडा वसातीमध्ये मध्यरात्री एक वाजता घडली. या घटनेत पोलीस कर्मचारी कट्टे हे जखमी झाले आहेत. (Pune Police Crime Branch News)

 

 

शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्री संपूर्ण शहरात नाकाबंदी केली होती. या वेळी पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale) आणि पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे (ACP Sunil Tambe), पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट (PI Shrihari Bahirat), पोलीस उपनिरीक्षक पवार व त्यांचे सहकार्‍यांनी वारजे येथील म्हाडा वसाहतीमध्ये कोंबिग ऑपरेशन राबवत होते. गुन्हेगारांची चेकिंग करीत असताना त्यांना रोझरी स्कुलजवळ ८ ते १० जणाच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. तेव्हा त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिस त्यांच्या दिशेने जात होते. त्यावेळी त्यांच्यातील एकाने पिस्तुल काढून पोलिसांच्या दिशेने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला.

 

यावेळी पोलिसांनीही गोळीबार केला. तेव्हा झालेल्या झटापटीमध्ये एका चोरट्याने पोलिसांच्या दिशेने कोयता फेकून मारला.
तो पोलीस कर्मचारी कट्टे यांना लावून ते जखमी झाले. यावेळी पोलिसांनी त्यांच्यातील ५ जणांना पकडले.
इतर जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. पकडलेल्या ५ जणांकडून एक गावठी कट्टा,
४ जिवंत काडतुसे, कोयते, कटावणी, स्क्रु ड्रायव्हर, हातोडा असा माल जप्त केला आहे.

 

स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याच्या तयारीने हे दरोडेखोर आले होते. हे दरोडेखोर सराईत गुन्हेगार असून
त्यांच्यावर गंभीर गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

 

Web Title :  Pune Police Crime Branch News | Firing On Criminals In Warje Malwadi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा