पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Crime Branch News | पुणे शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेमधील वाहन चोरी विरोधी व दरोडा प्रतिबंधक पथक – 1 ने मुलींची छेडछाड (Molestation Case) करणार्याला जनवाडी परिसरातील जनसेवा चौकाजवळुन अटक केली आहे. त्याच्याकडून एक लोखंडी हत्यार जप्त करण्यात आलेले आहे. (Pune Police Crime Branch News)
आदित्य उर्फ बकासुर अविनाश मोरजकर Aditya alias Bakasur Avinash Morajkar (19, रा. होमी बाबा हॉस्पीटलजवळ, वडार वाडी, शिवाजीनगर, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गुन्हे शाखेतील वाहन चोरी विरोधी व दरोडा प्रतिबंधक पथक-1 मधील पोलिस अधिकारी पोलिस अंमलदार हे चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याच्या (Chaturshringi Police Station) हद्दीत खासगी वाहनाने पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार धनंजय ताजणे, मॅगी जाधव आणि प्रदीप राठोड यांना आरोपी आदित्य मोरजकर हा जनवाडी परिसरातील जनसेवा चौकाजवळ उभा असल्याचे समजले. प्राप्त माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचुन त्याला अटक केली. (Pune Police Crime Branch News)
त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक लोखंडी हत्यार मिळून आले. पोलिसांनी ते जप्त केले आहे.
त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने मुलींची छेडछाड केल्याचे कबुल केले. आरोपीला चतुःश्रृंगी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल तांबे (ACP Sunil Tambe) यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन चोरी विरोधी व दरोडा प्रतिबंधक पथक-1 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर (Sr PI Ashok Indalkar), पोलिस उपनिरीक्षक शाहीद शेख (PSI Shahid Shaikh) , पोलिस अंमलदार प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, मॅगी जाधव, गणेश ढगे आणि अजिनाथ येडे यांच्या पथकाने केली आहे.
Web Title : Pune Police Crime Branch News | Pune crime branch arrested the person who molested the girls
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Pune Police MPDA Action | कोंढवा अन् वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरविणार्याविरूध्द एमपीडीएची कारवाई ! पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 31 वी स्थानबध्दतेची कारवाई
- Mrunal Thakur | सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल ठाकूर नक्की धुळ्याची की नागपूरची? वाद मिटला, मृणालने दिले उत्तर
- Nagrik Hakka Sanrakshan Manch | ससून रुग्णालयाकडून नागरिकांची सनद प्रसिद्ध, रुग्णांच्या आर्थिक फसवणूकीला बसणार चाप