Pune Police Crime Branch News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच न्यूज : मित्रांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी पिस्टल बाळगणार्‍याला सराईत गुन्हेगाराला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Crime Branch News | पुणे शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेतील युनिट-3 च्या पथकाने मित्रांमध्ये दहशत निर्माण करणार्‍यासाठी पिस्टल बाळगणार्‍याला (Pistol Seized) अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि 2 जिवंत काडतुसे असा एकुण 40 हजार 800 रूपयाचा ऐवज जप्त केला आहे. (Pune Police Crime Branch News)

निलेश भाऊराव काळे Nilesh Bhaurao Kale (25, रा. सर्व्हे नं. 53, संतोषीमातानगर, काळेपडळ, हडपसर, पुणे – Kalpadal Hadapsar) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट-3 मधील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संतोष क्षीरसागर आणि पोलिस अंमलदार राजेंद्र मारणे हे परिसरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना आरोपी हा कर्वेनगर भाजी मार्केट (Bhaji Market Karve Nagar) येथील विठ्ठल मंदिरावरील कट्टयावर असल्याची माहिती मिळाली होती. प्राप्त माहितीची खातरजमा करून पोलिसांनी सापळा रचुन त्याला ताब्यात घेतले. (Pune Police Crime Branch News)

त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडुन 1 गावठी कट्टा (Gavti Katta) आणि 2 जिवंत काडतुसे असा एकुण 40 हजार 800 रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपी निलेश भाऊराव काळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरूघ्द मुंढवा पोलिस स्टेशनमध्ये (Mundhwa Police Station) गुन्हा दाखल आहे. मित्रांवर दहशत निर्माण करण्यासाठी आपण पिस्टल बाळगल्याचे निलेश काळेने सखोल तपासाअंती कबुल केले आहे.

 

Advt.

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट (Sr PI Shrihari Bahirat),
पोलिस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील (PSI Ajitkumar Patil), पोलिस उपनिरीक्षक राहुल पवार (PSI Rahul Pawar), सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संतोष जगताप, पोलिस अंमलदार राजेंद्र मारणे, शरद वाकसे, किरण पवार, सुरेंद्र साबळे, सुजीत पवार, संजिव कळंबे, सतिश कत्राळे, प्रताप पडवाळ, ज्ञानेश्वर चित्त, प्रकाश कट्टे, साईनाथ पाटील, गणेश शिंदे सोनम नेवसे आणि भाग्यश्री वाघमारे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Web Title :- Pune Police Crime Branch News | Pune Police Crime Branch Arrested
Criminal who carrying pistol to create terror among friends

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Shrikant Shinde | ‘निवडणुकीची खुमखुमी असेल तर…’, खा. श्रीकांत शिंदेंचं उद्धव ठाकरे गटाला थेट आव्हान (व्हिडिओ)