Pune Police Crime Branch News | कर्वेनगरमधील कॉलेजच्या जवळील पानपट्टीतून गांजा अन् बंटा गोळ्यांची विक्री

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Crime Branch News | कर्वेनगर परिसरातील एका कॉलेजच्या (College In Karve Nagar) जवळील पानपट्टीतून गांजा (Ganja) आणि बंटा गोळयांची (Banta Golya) विक्री करणार्‍या पानपट्टीचालकाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-1 ने Anti Narcotics Cell Pune (ANC Pune) अटक केली आहे. त्याच्या पानपट्टीतून 110 ग्रॅम गांजा आणि 3 किलो 515 ग्रॅम बंटा जप्त करण्यात आला आहे. (Pune Police Crime Branch News)

 

रामबाबु देवनारायण महतो Rambabu Devnarayan Mahato (31, रा. कर्वेनगर, कॅनोल रोड, गल्ली नं. 8 च्या समोर, पुणे. मुळ रा. रोहुवा, जि. सातावाडी, पोस्ट पोहबारवा, बिहार) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गुन्हे शाखेतील अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिस अधिकारी आणि पोलिस अंमलदार हे वारजे माळवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी परिसरातील एका कॉलेजच्या जवळ असलेल्या ओम साई पान शॉपमधून लोकांना गांजा आणि बंटा या अंमली पदार्थांची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिस अंमलदार पांडुरंग पवार आणि सचिन माळवे यांना मिळाली. प्राप्त माहितीची खातरजमा करण्यात आली. (Pune Police Crime Branch News)

 

पोलिस पथकाने ओम साई पान शॉप या पानपट्टीवर छापा टाकला. रामबाबु देवनारायण महतो याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या पानपट्टीतून 110 ग्रॅम गांजा, 3 किलो 515 ग्रॅम बंटा आणि मोबाईल फोन असा एकुण 47 हजार 350 रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला. त्याच्याविरूध्द वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) एनडीपीएस अ‍ॅक्टनुसार (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल तांबे (ACP Sunil Tambe) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड (Sr PI Vinayak Gaikwad),
सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर (API Shailaja Jankar), पोलिस अंमलदार मारूती पारधी,
प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, पांडुरंग पवार, संदिप शिर्के, राहुल जोशी, सचिन माळवे, सुजित वाडेकर,
ज्ञानेश्वर घोरपडे, नितेश जाधव, रेहाना शेख, संदेश काकडे आणि योगेश मोहिते यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

 

Web Title :  Pune Police Crime Branch News | Sale of Ganja and Banta Pills from Pan Shop near College in Karvenagar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा