Pune Police Crime Branch | पुण्यातील ‘न्यू रायजिंग गँग’चा म्होरक्या विशाल उर्फ जंगल्या सातपुतेसह तिघे गोत्यात, गुन्हे शाखेकडून कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे शहरात टोळीचा जम बसवण्यासाठी व्यावसायिकाकडे दोन लाखांची खंडणी (Ransom) मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. व्यावसायीकाकडे दोन लाखांची खंडणी मागून तडजोडीत एक लाखाची खंडणी घेताना न्यू रायझिंग गँगचा (New Rising Gang) म्होरक्या विशाल उर्फ जंगल्या सातपुते (Vishal alias Jangalya Satpute) व त्याच्या दोन साथिदारांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक एकने (Anti-ransom squad) मुसक्या आवळल्या आहेत. गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई विमाननगर येथील हॉटेल हयात रिजन्सी (Hotel Hyatt Regency) येथे केली.

विशाल उर्फ जंगल्या शाम सातपुते, मंगेश शाम सातपुते Mangesh Sham Satpute (दोघे रा. पीएमसी कॉलनी नं.9, घोरपडी पेठ पुणे),
अक्षय दत्तात्रय भालेराव Akshay Dattatraya Bhalerao (रा. पापडेवस्ती, भेकराईनगर, हडपसर) अशी खंडणी घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपींविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी संदीप बाबासाहेब नवघणे Sandeep Babasaheb Navaghane (रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार नवघणे यांचा टिंबर होलसेल विक्रीचा व्यवसाय आहे.
तक्रारदार यांना 28 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर 2021 या कालावधीत आरोपींनी दोन लाखाची खंडणी मागितली. आरोपी विशाल उर्फ जंगल्या सातपते
याच्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) खूनाचा गुन्हा दाखल असून 8 वर्षानंतर तो पॅरोलवर तात्पुरत्या जामिनावर (Temporary bail on parole)
बाहेर आला आहे.
सातपुते हा खडक पोलीस ठाण्याच्या (Khadak Police Station) हद्दीतील न्यू रायझिंग गँगचा म्होरक्या असून त्याने गँगचा पुण्यात जम बसवण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे दोन लाखाची खंडणी मागितली होती.

 

आरोपी सतापुते याने वेगवेगळ्या नंबरवरुन तक्रारदार यांना फोन करुन खंडणी मागितली. तसेच खंडणी न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.
तक्रारदार यांनी गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केल्यानंतर बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आरोपीला
विमानगर येथील हॉटेल हयात रिजेन्सी येथे बोलावून घेतले.
तडजोडीमध्ये तक्रारदार यांच्याकडून 1 लाख रुपये खंडणीची रक्कम स्विकारताना आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve), प्रभारी अपर पोलीस आयुक्त गुन्हे भाग्यश्री नवटके
(IPS Bhagyashree Navatke), पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare), पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan),
अंमलदार सुरेंद्र जगदाळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, सचिन अहिवळे, संपत औचरे, विजय गुरव, संग्राम शिनगारे,सौदाबा भोजराव, अमोल पिलाणे, राहुल उत्तरकर,
प्रदिप गाडे, मोहन येलपल्ले, चेतन शिरोळकर, रुपाली कर्णवर, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Pune Police Crime Branch | Pune-based ‘New Rising Gang’ leader Vishal alias Jangalya Satpute and three others arrested in three cases

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Lakhimpur Kheri Video | लखीमपूर खेरी घटनेचा आणखी एक व्हिडीओ समोर; मंत्र्याच्या भरधाव SUV नं शेतकऱ्यांना चिरडलं

Navratri Utsav 2021 | नवरात्री उत्सवानिमित्त PM नरेंद्र मोदींच्या देशवासियांना शुभेच्छा !

Navratri Utsav | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी केली मुंबादेवीच्या चरणी प्रार्थना, म्हणाले – ‘कोरोनाचे सावट कायमसाठी जाऊ दे’ (व्हिडीओ)