Pune Police Crime Branch | 7 वर्षे फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मारामारीच्या गुन्ह्यात सात वर्षे फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला (criminal) गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. गुन्हे शाखेने (Pune Police Crime Branch) ही कारवाई मांगडेवाडी येथे शुक्रवारी (दि.8) केली. राहुल संजय क्षिरसागर (वय-23 रा. जुनी पाण्याची टाकी जवळ, मांगडेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 जुलै 2015 रोजी उरळी देवाची येथे फिर्यादी विशाल चौधरी (Vishal Chaudhary)  हे 5 ते 6 जण एकाला मारहाण करत असल्याचे पाहून त्या ठिकाणी गेले. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना डोक्यात, तोंडावर, मानेवर दगडाने मारहण करुन गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी दिपक राठोड, राहुल क्षिरसागर, राहुल रंधवे यांच्यावर लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात (Lonikalbhor police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात काही आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र, राहुल क्षिरसागर हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता.

गुन्हे शाखा (Pune Police Crime Branch) युनिट एकचे पोलीस  हद्दीत गस्त घालत असताना मारामारीच्या गुन्ह्यातील सात वर्षे फरार असलेला आरोपी राहुल क्षिरसागर (Rahul Kshirsagar) हा आजीला भेटण्यासाठी मांगडेवाडी येथे येणार असल्याची माहिती अंमलदार अमोल पवार (Amol Pawar) यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी राहुल क्षिरसागर याच्यावर पुण्यातील भारती विद्यापीठ (bharti vidyapeeth police station), बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibwewadi police station) खुनाचा प्रयत्न, मारामारी, दरोड्याची तयारी असे तीन गुन्हे दाखल आहेत. पुढील कारवाईसाठी आरोपीला लोणीकाळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे भाग्यश्री नवटके (IPS Bhagyashree Navatke),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1/2 लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Senior Police Inspector Shailesh Sankhe),
पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड (PSI Sanjay Gaikwad), सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार अमोल पवार,
अजय थोरात, इम्रान शेख, तुषार माळवदकर यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Police Crime Branch | pune police crime branch arrest criminal who abscond from seven years

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्याच्या लोहगाव येथील विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा; संगणक अभियंता ‘गोत्यात’

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 2,943 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | पुण्यात ‘बिल्डर’ अविनाश भोसले, विनोद गोयंका आणि विकास ओबेराय यांच्यासह 15 जणांविरुद्ध गुन्हा, प्रचंड खळबळ