Pune Police Crime Branch | दुकानांमधील किमती सिगरेटची पाकीटे चोरणारा गुन्हे शाखेकडून गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  बंद दुकानांचे कुलुप तोडून दुकानमधील किमती सिगरेट पाकीटे चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट (Pune Police Crime Branch) चारच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीने शनिवारी (दि.23) रात्री चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुर्वेश बेकरीमध्ये चोरी केली होती. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Pune Police Crime Branch) आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि किमती सिगरेट पाकिटे (Cigarette packet) असा एकूण 1 लाख 17 हजार 120 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

सुरज बळीराम कदम (वय-29 रा. ताडीवाला रोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi police station)
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखा युनिट चारचे पथकातील (Pune Police Crime Branch) पोलीस अंमलदार राकेश खुणवे (Rakesh Khunve) व अशोक शेलार (Ashok Shelar)
यांनी सीसीटीव्ही फुटेज द्वारे आरोपींची माहिती काढली.
दरम्यान, वेगवेगळ्या कंपनीची चोरलेली सिगारेटची पाकिटे निम्म्या किमतीत विकण्यासाठी आरोपी संगमवाडी पार्किंग 2 (Sangamwadi Parking 2)
परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली.

 

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संगमवाडी पार्किंग 2 च्या परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गोखलेनगर रोडवरील दुर्वेश बेकरी या दुकानात चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करुन पुढील कारवाईसाठी आरोपीला चतु:श्रृंगी पोलिसांच्या ताब्यात दिले.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर (Police Inspector Jayant Rajurkar),
उप निरीक्षक जयदीप पाटील (PSI Jaideep Patil), पोलीस अंमलदार महेंद्र पवार,
दत्तात्रय फुलसुंदर, विशाल शिर्के, राकेश खुणवे, अशोक शेलार यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Pune Police Crime Branch | The crime of stealing packets of cigarettes from shops has been arrested by pune police crime branch

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Life Certificate | Pensioners Alert ! थांबू शकते तुमची पेन्शन, जर लवकरात लवकर केले नाही ‘हे’ काम

MSRTC | एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यासह दिवाळी बोनस जाहीर

Mumbai Drugs Case | आणखी एक मोठा ट्विस्ट ! समीर वानखेडेंवर NCB अधिकाऱ्याचा गंभीर आरोप; मलिकांना निनावी पत्र पाठवत, म्हणाले…