Pune Police Crime News | पुण्यातील विश्रामबाग पोलिसांच्या लॉकअपमध्ये आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या; काल रात्रीच केले होते लॉकअपमध्ये बंदिस्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Crime News | विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या (Vishrambaug Police Station) अंतर्गत असलेल्या पोलीस कोठडीत (Police Custody) चोरीच्य गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. (Pune Police Crime News )

 

शिवाजी उत्तम गरड (Shivaji Uttam Gard) असे आत्महत्या (Pune Suicide News) केलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना आज सकाळी ६ वाजता उघडकीस आली.

 

शिवाजी गरड याला वाहनचोरीच्या गुन्ह्यात गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने त्याला १२ मे रोजी अटक केली होती. तपासानंतर त्याला काल रात्री विश्रामबाग पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. आरोपीला झोपण्यासाठी दिलेल्या चादरीचा काठ फाडून त्यांची लांब दोरी तयार केली. सकाळी तो संडासासाठी बाथरुममध्ये गेला. तेथील जाळीला त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळाने त्याने आत्महत्या केल्याचे आढळून आले. (Pune Crime News)

 

विश्रामबाग पोलीस कोठडीच्या मुख्य पॅसेजमध्ये तसेच आतमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. मात्र, बाथरुममध्ये कॅमेरे नाहीत.

पोलीस कोठडीत आरोपीचा मृत्यु झाला असल्यास त्याचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग Maharashtra State Crime Investigation Department (Maharashtra CID) सीआयडीकडे जातो. त्याप्रमाणे या घटनेची माहिती सीआयडीला देण्यात आली आहे.
तसेच अशा घटनेतील आरोपीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन तहसीलदारांच्या उपस्थितीत,
व्हिडिओ शुटिंग करुन केले जाते. त्यानुसार शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

 

 

Web Title :  Pune Police Crime News | Accused commits suicide by hanging in Pune’s
Vishram Bagh police lockup; Locked up last night

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा