Pune Police Crime News | भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन : गावठी कट्टे घेऊन होते फिरत, अपघात झाला अन् त्यांचे बिंग फुटले; 2 गावठी कट्टे व 2 जिवंत काडतूस जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Crime News | कात्रज घाटातून एकाच दुचाकीवर चौघे जण मस्ती करत फिरत होते. कात्रज घाटातून पुण्याकडे येताना वळणावर मोटारसायकलला अपघात (Accident In Katraj Ghat) झाला. ते जखमी झाले. अन् त्यांच्याकडे हत्यारे असल्याचे निष्पन्न झाले. पुणे पोलिसांनी (Pune Police) चौघावर गुन्हा दाखल करुन २ गावठी कट्टे (Pistol) व २ जिवंत काडतूस जप्त केले आहेत. (Pune Police Crime News)

 

संतोष राजू पासवान Santosh Raju Paswan (वय २१, रा. बेनकर वस्ती, धायरी) व त्यांचे दोन अल्पवयीन मित्र हे जखमी झाले असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) उपचार करण्यात येत आहे. तर चौथा मित्र घटनास्थळावरुन पळून गेला. (Pune Police Crime News)

 

याबाबत पोलीस अंमलदार गणेश खंडू काळे (Police Ganesh Khandu Kale) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २६७/२३) दिली आहे. हा प्रकार कात्रज घाटात जुन्या बोगद्याकडून कात्रजकडे (Old Katraj Tunnel) येताना तिसर्‍या वळणावर शनिवारी पहाटे साडेतीन वाजता घडला.

अल्पवयीन मुले मोटारसायकलवरुन पुण्याकडे येत होती. यावेळी कात्रज घाटातील तिसर्‍या वळणावर त्यांच्या मोटारसायकलला अपघात झाला. तिघेही गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत त्यांचा चौथा सहकारी पळून गेला होता. पोलिसांनी तिघांना ससून रुग्णालयात दाखल केले.
त्यावेळी त्यांच्याकडे २ गावठी कट्टे व २ जिवंत काडतूस आढळून आले.
पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील (DCP Smartana Patil),
सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर (ACP ACP Narayan Shirgaonkar)
यांच्यासह इतर पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली.
पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

 

Web Title :  Pune Police Crime News | Bharti Vidyapeeth Police Station: Accident Of
Pune Criminals in Katraj Ghat; 2 Desi Pistol and 2 live cartridges seized

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा