Pune Police Crime News | बिबवेवाडीत दुकानदारावर खुनी हल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Crime News | कार्यक्रमासाठी डिस्पोझिबल प्लेट (Disposable Party Plate) व इतर साहित्य वापरले जाते. अतिशय किरकोळ किंमतीला या वस्तू मिळतात. सुट्या ५ डिस्पोझिबल प्लेट दिल्यानंतर त्याचे पैसे मागितल्याने बिबवेवाडीतील दुकानात (Bibvewadi Shop) काम करणार्‍यावर कोयत्याने वार (Attempt To Kill) करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Murder) एका टोळक्याने केला. तर त्याच्या सहकार्‍याला बेदम मारहाण केली. (Pune Police Crime News)

 

धर्माराम गोकुळराम बंजारा (वय २२, रा. चिंतामणी रेसिडेन्सी, सुखसागरनगर, कात्रज) असे जखमी झालेल्यांचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी (Bibvewadi Police Station) निखील नितीन गावडे Nikhil Nitin Gawade (वय २२, रा. राजीव गांधीनगर, अप्पर बिबवेवाडी) याला अटक केली असून त्याच्या इतर तीन साथीदारांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना अप्पर बिबवेवाडी येथील अंबिका डिस्पोझबल अँड बर्थ डे हाऊसमध्ये २८ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धर्माराम बंजारा व त्यांचा साथीदार मंगाराम बंजारा हे दोघे अंबिका डिसपोझबल या दुकानात काम करीत होते. त्यावेळी निखील
याने त्यांच्याकडे सुट्या ३ डिस्पोझिबल प्लेट मागितल्या. फिर्यादीने त्यांना ५ प्लेट देऊन त्याचे पैसे मागितले.
या कारणावरुन त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ करुन त्यांच्यातील एकाने हातातील कोयत्याने फिर्यादीचे हातावर,
कपाळावर मारुन गंभीर जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
तसेच त्यांचा सहकारी मलगराम याच्या हाताचे बोटावर वार करुन त्याला जखमी केले.
लाठ्या काठ्याने मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक संजय आदलिंग (PSI Sanjay Adling) तपास करीत आहेत.

 

Web Title :  Pune Police Crime News | Murderous attack on a shopkeeper in Bibvewadi Police Station Area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा