पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Crime News | पुणे पोलीस दलातील (Pune Police) पोलीस उपनिरीक्षक सुनिल मोरे यांचे शुक्रवारी (दि.3) दुपारी (PSI Sunil More Passed Away) हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झाले. सुनिल मोरे हे चतु:श्रृंगी वाहतूक विभागात (ChaturShringi in Traffic Branch) पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते.

पोलीस उपनिरीक्षक सुनिल मोरे हे जेवण करण्यासाठी जात असताना त्यांना हृदयविकाराचा तिव्र झटका आला. यामध्ये मोरे यांची प्राणज्योत मालवली. सुनील मोरे यांना नुकतीच खात्यांतर्गत पदोन्नती (Promotion) मिळाली होती. मोरे हे मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या अचानक जाण्याने पुणे पोलीस दलासह चतु:श्रृंगी वाहतूक विभागावर शोककळा पसरली आहे.(Pune Police Crime News)
सुनील मोरे यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
Web Title :- Pune Police Crime News | Pune police sub-inspector dies of heart attack
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Joginder Sharma | भारताचा वेगवान गोलंदाज जोगिंदर शर्माची क्रिकेटमधून निवृत्ती
Satara News | धक्कादायक ! साताऱ्यात 20 वर्षीय तरूणाचा आढळला मृतदेह