Pune Police Crime News | कोटयावधीची फसवणूक करणार्‍यास अटकेपुर्वी पोलिस अधिकारी-कर्मचार्‍याचा वरदहस्त? पोलिस दलात चर्चेला उधाण

पुणे (नितीन पाटील ) – Pune Police Crime News | कोटयावधीची फसवणूक करणार्‍यास, गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर केवळ 8 दिवसांमध्ये दीडपट पैसे देण्याचे आमिष दाखविणार्‍यास पुणे शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेतील (Pune Police Crime Branch) एका अधिकारी व कर्मचार्‍याचा वरदाहस्त होता अशी चर्चा पोलिस वर्तुळामध्ये रंगली आहे. दरम्यान, गुन्हे शाखेच्या युनिट-3 च्या पथकाने पैसे दीडपट करून देण्याचे आमिष दाखविणार्‍या संतोष रामचंद्र लिमण Santosh Ramchandra Liman(37) याला अटक केली. त्यानंतर त्यावर अटकेपुर्वी वरदाहस्त असणार्‍या पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचार्‍याची चांगलीच ‘भंबेरी’ उडाली. शनिवारी संतोष लिमणला युनिट-3 च्या कार्यालयातून पोलिस आयुक्तालयात बोलावून घेण्यात आले आणि ‘घोळ’करांनी त्याला केबिनमध्ये ‘प्रसाद’ देत चांगलीच दमबाजी केली असल्याची चर्चा सध्या पोलिस वर्तुळामध्ये आहे. (Pune Police Crime News)

आपला बडया राजकीय पुढार्‍यांशी तसेच पोलिस अधिकार्‍यांशी परिचय आहे. त्यांच्यासोबत बसणे-उठणे आहे असे संतोष लिमण गुंतवणूकदारांना सांगत होता. संतोष लिमणचे अटकेपुर्वी पोलिस आयुक्तालयात चांगलेच येणे-जाणे होते. तो पोलिस अधिकार्‍यासोबत गाडीतून फिरत देखील होता. त्याने काही जणांना प्रॉपर्टी देखील दाखविली होती अशी चर्चा पोलिस दलामध्ये सध्या रंगली आहे. संतोष लिमणला युनिट-3 ने अटक केल्यानंतर पोलिस कर्मचारी ‘घोळ’कर हा एकेदिवशी युनिट-3 च्या कार्यालयासमोर रात्री उशिरापर्यंत पाहारा देत होता अशी देखील माहिती समोर येत आहे. (Pune Police Crime News)

पोलिस दलात रंगलेल्या चर्चेची माहिती अति वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना देखील समजली असल्याचे बोलले जात आहे. एवढेच नव्हे तर अति वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी संबंधित पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचार्‍याला चांगलेच फैलावर घेतले अशी माहिती देखील सुत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, संतोष लिमणने 8 दिवसात पैसे दीडपट करून देण्याचे आमिष दाखवून आतापर्यंत अनेकांची फसवणूक केली आहे. त्यापैकी 10 गुंतवणूकदार समोर आले असून त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला आहे.

वरदाहस्त देण्यासाठी संतोष लिमण याच्याकडून मोठा ‘मलिदा’ देखील घेण्यात आल्याची चर्चा आहे.
अटकेच्या काही महिन्यांपुर्वी संतोष लिमण पोलिस अधिकारी व कर्मचार्‍याचा चांगलाच संपर्कात होता.
त्यांचे काही व्यवहार देखील झाले आहेत असे देखील बोलले जात आहे.
संतोष लिमणला अटक झाल्यानंतर न्यायालयाने त्याला दि. 8 मे 2023 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.
कोठडीत असताना लिमणवर संबंधितांनी दमबाजी देखील केली आहे.
दरम्यान, पोलिस कोठडीची मुदत संपल्याने लिमणला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला
पुन्हा एकदा पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दि. 10 मे पर्यंत त्यास पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
प्रकरण गंभीर असल्याने युनिट-3 कडून प्रकरणाचा तपास चोख करण्यात येत आहे.

Advt.

Web Title :- Pune Police Crime News | The police officer and police personal support before the arrest of the fraudster of crores? A discussion in the pune police force

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 1 लाखाची लाच घेणारा निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Deepak Kesarkar | मराठी भाषा धोरणाचा मसूदा शासनास सादर; मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर

Sudhir Mungantiwar | ‘अजित पवारांच्या कार्यकाळात मंत्रालयात हजारो दारूच्या  बाटल्या…’, सुधीर मुनगंटीवार यांचा खळबळजनक आरोप