बेटींग घेणाऱ्यां तिघांना अटक ; पुणे पोलिसांची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विश्वचषक स्पर्धेमधील भारत विरुद्ध वेस्टइंडीज सामन्यावर बेटींग घेणाऱ्या तीघांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई गुरुवारी रात्री नानापेठेतील प्रेमं चेंबर येथे करण्यात आली. या कारवाई १ लाख १५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संदिप कन्हैयालाल जाजु (वय-४९ रा. सदाशिप पेठ, श्रीपाद अपार्टमेंट), इम्रान जाकिर कादरी (वय-२७ रा. कात्रज), सागर बाबु माने (वय-३१ रा. जनकवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
गुरुवारी भारत विरुद्ध वेस्टइंडीज सामन्या दरम्यान नाना पेठेतील प्रेम चेंबरमध्ये सट्टा घेतला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकास मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून तीघांना अटक केली. त्यांच्याकडून ११ मोबाईल, टीव्ही, कम्युनिकेटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक्सचे साहित्य असा एकूण १ लाख १५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यात संदिप जाजु हा मुख्य सुत्रधार आहे. आरोपींवर जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथक पश्चिमचे पोलीस निरीक्षक राजेद्र मोहिते, पोलीस उप निरीक्षक आनंद रावडे, निखील पवार, पोलीस कर्मचारी भाऊसाहेब कोंढरे, रमेश गरुड, महेश कदम, हनुमंत गायकवाड, सुनिल चिखले, प्रविण पडवळ, अमोल पिलाणे, नारायण बनकर, सुमित ताकपेरे यांच्या पथकाने केली.