पादचार्‍याचा मोबाईल हिसकाविणार्‍या सराईतासह तिघांना अटक

पुणे, पोलीसनामा ऑनलाईन – जेवणानंतर वॉकिंग करणार्‍या नागरिकाचा मोबाईल हिसकाविणार्‍या सराईतासह तिघांना गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून मोबाईल व दुचाकी असा 52 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

रोहित किशोर जोगदंड (वय 21, रा. लष्कर) ऋतिक सुशील गजबे (वय 19), सागर दीपक अडागळे (रा. येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बाबुराव यल्लप्पा गाडेकर, ( रा. वॅैम्प,मूळ-सोलापूर) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

सागर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध बंडगार्डन, येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, 16 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा करत होती. यादरम्यान, तिघेजन लष्कर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गाडेकर यांचा मोबाईल हिसकाविल्याची कबुली दिली.

Visit : policenama.com