Pune Police Cyber Crime News | पुण्यातील पोलिसाने 5 भाषेतून आदरयुक्त ‘आदेश’ देवून हस्तगत केले 9 राज्यातून 51 हरवलेले मोबाईल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Cyber Crime News | पुणे शहर पोलिस (Pune City Police) दलातील शिवाजीनगर पोलिस स्टेशनमधील (Shivaji Nagar Police Pune) सायबर कक्षात कार्यरत असणार्‍या एका पोलिस कर्मचार्‍याने चक्क 5 भाषेचा वापर करून 9 राज्यातून 51 हरवलेले मोबाईल हस्तगत केले आहेत. शिवाजीनगर पोलिस स्टेशनमधील सायबर कक्षातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या टीमनं ही कामगिरी केली आहे. हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदारांच्या चेहर्‍यावर एक वेगळाच आनंद पहावयास मिळाला आहे. (Pune Police Cyber Crime News )

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजीनगर पोलिस स्टेशनच्या सायबर कक्षातील सहाय्यक पोलिस निरीक्षक बाजीराव नाईक (API Bajirao Naik), पोलिस अंमलदार रूपेश वाघमारे (Police Rupesh Waghmare), आदेश चलवादी (Police Aadesh Chalwadi) आणि रूचिका जमदाडे (Polie Ruchika Jamdade) यांनी परिसरातून हरवलेल्या मोबाईलचा डेटा तयार केला होता. त्यांनी त्याबाबत तांत्रिक तपास करून त्याचा वेळावेळी पाठपुरावा केला. पुण्यातून हरवलेले मोबाईल (Missing Mobile) हे गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, पश्चिम बंगला, बिहार, पंबाज आणि महाराष्ट्रात विविध ठिकाणी अ‍ॅक्टिव्ह असल्याचे सायबर कक्षातील अधिकारी व कर्मचार्‍यांना लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी सदरील मोबाईल फोन वापरकर्त्यांशी तसेच संबंधित पोलिस स्टेशनमध्ये पोलिस अंमलदार आदेश चलवादी यांनी कन्नड, तेलगु, हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषेचा वापर करून संवाद साधला. (Pune Police Cyber Crime News)

त्यांच्याजवळ असलेला मोबाईल हा पुणे आणि परिसरातून हरवला असून त्याबाबत पोलिस स्टेशनमध्ये नोंद असल्याचे मोबाईल वापरकर्त्यांना सांगितले. आदेश चलवादी यांनी त्यांच्याकडे असलेल्या बहुभाषिक कौशल्याचा पुरेपुर वापर करून एक वेगळीच कसब दाखवित 9 राज्यातुन 9 लाख 50 हजार रूपये किंमतीचे 51 मोबाईल हस्तगत केले. सदरील मोबाईल संबंधित तक्रारदारास परत मिळाल्याने त्यांच्या चेहर्‍यावर एक वेगळाच आनंदा पहावयास मिळाला. संबंधित तक्रारदारांनी पुणे पोलिसांचे आभार व्यक्त केले.

दरम्यान, नागरिकांनी त्यांचा मोबाईल हरविल्यास त्याबाबतची तक्रार तात्काळ ऑनलाइन पध्दतीने पुणे पोलिसांच्या
वेबसाईटला करावी अथवा शासनाच्या Central Equipment Identity Register (CEIR) या पोर्टलवर नोंद
करून करावी असे आवाहन पुणे शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे (IPS Rajendra Dahale), पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल्ल
(IPS Sandeep Singh Gill ), सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने (Sr PI Arvind Mane),
पोलिस निरीक्षक (गुन्हे) विक्रम गौड (PI Vikram Gaud), सहाय्यक पोलिस निरीक्षक बाजराव नाईक,
पोलिस अंमलदार रूपेश वाघमारे, गणपत वालकोळी, आदेश चलवादी, तुकाराम म्हस्के, अर्जुन कुडाळकर आणि
रूचिका जमदाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title :- Pune Police Cyber ​​Crime News | Pune Shivaji Nagar Police seized 51 mobiles from 9 states by issuing respectful orders in 5 languages

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil On SRA In Pune | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या योजनांचा आढावा

Gulabrao Patil | ‘राजीनामा देण्याइतकी संजय राऊतांची लायकी नाही’, गुलाबराव पाटलांची सडकून टीका

Maharashtra Political News | एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रीपद जाणार?, दिल्लीत हालचाली सुरू; संजय राऊतांचा दावा