दामिनी मार्शलने रुसून आलेल्या मुलाची आईशी करून दिली भेट

पुणे – इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेला मुलगा आई मारत असल्यामुळे वाशिम येथून रुसून पुण्यात आला होता. त्याला तपास करून त्याच्या आईशी फोनवरून बोलणे करून दिले. त्यानंतर तुमचा मुलगा शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये सुखरूप आहे, त्याला शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दिल्याचे दामिनी मार्शल एस. ए. वलेकर यांनी सांगितले.

आकाश गणेश जाठे (वय 14, रा. भोकरखेड, जिजाऊनगर, ता. सिरोड, जि. वाशिम) असे मुलाचे नाव आहे.

दामिनी मार्शल वलेकर यांनी सांगितले की, डेक्कन आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशन परिसरात 26 जानेवारी रोजी आम्ही गस्तीवर होतो. त्यावेळी रिक्षाचालकांनी हा मुलगा रडत असल्याचे सांगितले. त्याला विश्वासात घेऊन विचारला असते त्याने मला आई खूप मारते मला आईकडे जायचे नाही, असे सांगताना तो घाबरलेला होता. त्याच्याकडून आईचा मोबाईल क्रमांक घेतला असता त्याला वडिल नसल्याचे समजले. त्याच्या आईशी संपर्क करून शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तुमचा मुलगा सुखरूप असल्याचे सांगितले. त्यानंतर मुलाला शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विक्रम गौड, सहायक पोलीस निरीक्षक मुंढे, सहायक पोलीस उपनिरीक्षक चांदेकर व महिला पोलीस शिपाई पूजा सारसर यांच्याकडे दिले.