काय सांगता ! होय, पोलिसांनी चक्क मुक्या जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न सोडविला

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – आगळ्या वेगळ्या उपक्रमासाठी पुणे पोलिस नेहमी चर्चेत तर असतातच पण आता ते अश्याच एका चांगल्या कामामुळे. हडपसर पोलिसांनी मुक्या जनावारांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवला आहे. स्वतः कर्मचाऱ्यांनी मंडईमधून पडलेला चारा गोळाकरून पोत्यानी तुकाई टेकडीवरील जनावरांना टाकला आहे. विशेष पोलीस अधिकाऱ्यांच्या साहाय्याने हे काम केले आहे.

पोलीस कर्मचारी तानाजी देशमुख, नितीन चौधरी आणि विशेष पोलिस अधिकारी मुलाणी यांनी हे काम केले आहे. त्यांच्या कामगिरीने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

चौधरी व देशमुख हे हडपसर पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. तर मुलाणी हे हडपसर परिसरात एसपीओ म्हणून काम करतात. दरम्यान मुलाणी यांना तुकाई टेकडी परिसरात काही गायी चाऱ्यासाठी वनवन फिरत आहेत. त्यांनी ही माहिती देशमुख यांना सांगितले. त्यांनी जाऊन पाहिले असता काही गायी फिरत असल्याचे दिसून आले. त्यावेळी देशमुख व चौधरी यांनी मंडईत धाव घेतली.

तेथील पडलेला चारा गोळा केला. तो पोत्यानी भरला. तसेच ते पोते तुकाई टेकडीवर आणून टाकले. त्यानंतर काही स्वयंसेवक देखील पोलिसांच्या मदतीला आले. त्यांनी देखील पोलिसांना मदत केली. त्यावेळी देशमुख यांनी मंडईमधील काही व्यापाऱ्यांची आणि या स्वयंसेवक यांची भेट करून देत येथील भाजीपाला गाईंना देण्याचे सांगितले. त्यानुसार आता येथे टाकून देण्यात आलेला भाजीपाला गाईंना मिळू लागला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like