17 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात पुणे पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रामटेकडी येथील राखीव पोलीस बल गट येथे पार पडलेल्या 17 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात पुणे पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी करत जनरल चॅम्पियनशीप व सीआयडी सेन्टेनरी ट्रॉफी असा दुहेरी बहुमान मिळवला आहे. विजेत्यांचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम आणि सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांनी अभिनंदन केले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धकांनी स्पधेत उत्तम कामगिरी करत पदक कमाई केली आहे.

1) सहायक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांनी फिंगर प्रिंट टेस्टमध्ये सुर्वण पदक मिळविले. तसेच, फॉरेन्सिक सायन्स रिटन टेस्टमध्ये रौप्य पदक आणि फोटोग्राफीमध्ये रौप्य व लिफ्टींग, पॅकिंग व लेबेलिंगमध्ये कांस्य पदक मिळवले.

2) पोलीस नाईक एस. पी. हाबळे यांना अ‍ॅन्टीसाबाटेज चेक स्पर्धेत सुर्वण पदक मिळविले. तर, पोलीस हवालदार पी. एस. ढोरजे यांना रौप्य पदक मिळविले.

3) पोलीस हवालादार एस. डी. शिरतोडे यांनी डॉग स्कॉड स्पर्धेत रौप्य पदक मिळविले आहे.

Visit : Policenama.com