Pune Police | पुण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक तडकाफडकी निलंबित! वरिष्ठ निरीक्षकासह पीएसआयची बदली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police | कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील (Chaturshringi Police Station) महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली ईश्वर सूळ (PSI Vaishali Ishwar Sul) यांना तडकाफडकी निलंबित (Suspended) करण्यात आले आहे. तर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे (Senior Police Inspector Rajkumar Waghachavare) यांची नियंत्रण कक्षात (Control Room) बदली केली आहे. (Pune Police) तसेच पोलीस उपनिरीक्षक शामल प्रकाश पोवार-पाटील (PSI Shamal Prakash Powar-Patil) यांची चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातून विशेष शाखेत (Special Branch) बदली करण्यात आली आहे. बदली आणि निलंबनाचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी सोमवारी (दि.21) संध्याकाळी काढले आहेत.

 

महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली सुळ यांच्याकडे चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल तक्रार अर्जाची चौकशी देण्यात आली होती. मात्र, सुळ यांनी तक्रार अर्जाची गांभीर्याने आणि अर्जाची संवेदनशीलता लक्षा न घेता अर्जावर ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे अर्जदार यांना आरोपींकडून मारहाण करण्यात आली. यामध्ये अर्जदार यांचा मृत्यू झाला. सुळ यांनी बेजबाबदार, बेफिकीर, गैरवर्तन केल्याने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पोलीस उपनिरीक्षक वैशाली सूळ यांचे निलंबन केले आहे. (Pune Police)

 

निलंबन काळात सूळ यांना कोणत्याही प्रकारची खजगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही. याबाबतचे प्रमाणपत्र देऊन निर्वाह भत्त्याची रक्कम स्वीकारावी लागेल, असे आदेशात नमूद केले आहे. तसेच निलंबन काळात मुख्यालय सोडून जायचे असेल तर अपर पोलीस आयुक्त प्रशासन (Addl CP Administration) व पोलीस उप आयुक्त मुख्यालय (DCP) यांची परवानगी घ्यावी लागेल.

 

पोलीस निरीक्षकाची बदली

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे.
राजकुमार वाघचवरे यांची विभागीय चौकशी (Departmental Inquiry) प्रलंबीत असल्याने त्यांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे.
याशिवाय महिला पोलीस उपनिरीक्षक शामल प्रकाश पोवार-पाटील यांची चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातून विशेष शाखेत बदली केली आहे.

 

 

Web Title :- Pune Police | Female police sub-inspector in Pune suspended! Transfer of PSI with Senior Inspector

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा