पुणे पोलिसांकडून विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍या 17 हजार जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विनाकारण भटकंती करणाऱ्यावर पुणे पोलिसांनी कारवाईने झोप उडवली असून, 20 दिवसात 17 हजार जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तरीही या भटकंती करणाऱ्यांची संख्या कमी होत नसल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर प्रतिबंधित क्षेत्रासह विविध ठिकाणी ही कारवाई केली आहे.

शहरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यावर प्रशासन कडक पावले टाकत ती रोखण्यासाठी झटत आहे. त्यात पोलीस प्रशासन विनाकारण बाहेर पडणाऱ्यासह नियम मोडणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे. वाहतूक विभाग व स्थानिक पोलिस ही कारवाई करत आहेत. पोलिसांकडून ४ ते २४ जुलैअखेर विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष मोहिम राबविण्यात आली आहे. त्यानुसार २७१ ठिकाणी नाकाबंदी करत २३५ अधिकारी आणि १ हजार ३२६ पोलीस कर्मचाऱ्यानी ही कारवाई केली आहे. त्यानुसार वेगवेगळ्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यात कलम १८८ नुसार तब्बल ६ हजार ६३७ जणांवार कारवाई करण्यात आली. त्याशिवाय विनापरवानगी फिरणाऱ्या तब्बल ४ हजार जणांवर कारवाई करण्यात आली. तर प्रतिबंधित क्षेत्रात राहणारे नागरिक देखील नियमांचे उल्लंघन करत आहेत. विशेषतः किरकोळ व्यवसायिक, छोटे-मोठे दुकानदार यांच्याकडून सोशल डिस्टन्स पाळला जात नसल्याचे दिसून आले आहे. शहरातील विविध भागात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असल्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर फिरु नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

—चौकट—-
शहरात २० दिवसांतील कारवाई
विनाकारण फिरणे-४००२
विनामास्क- २६५७
विनाकारण वाहनप्रवास-१२६७
वाहने जप्त-१३४८
कलम १८८ नुसार कारवाई-६६३७
राँग साईड ड्रायव्हिंग-१३२६

एकूण कारवाई- १७ हजार १३७

—कोट—
लॉकडाउनमध्ये प्रतिबंधित क्षेत्रासह वेगवेगळ्या भागात कारवाई केली आहे. त्यात बेशिस्त नागरिकांवर दंडात्मक व वाहनजप्तीची कारवाई करण्यात आली. कोरोनाचा धोका संपला नसून नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून पोलिसांना सहकार्य करावे.
बच्चन सिंह, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा