पुणे पोलिसांनी लॉकडाऊन दरम्यान जप्त केली 45 हजार वाहने, एवढी रक्कम अनामत म्हणून भरल्यानंतर मिळणार परत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   कोरोना काळात संचारबंदीत रस्त्यावर वाहने घेऊन येण्यास मनाई केल्यानंतर देखील विनाकारण वाहने घेऊन फिरणाऱ्याची वाहने जप्त करण्यात आली. आता ही वाहने अनामत रक्कम घेऊन परत करण्यात येणार असून, दुचाकी व तीन चाकीसाठी अडीच हजार रुपये तर चार चाकीसाठी 5 हजार रुपये रक्कम भरावी लागणार आहे. या काळात तबल ४५ हजार वाहने जप्त केली आहेत. नागरिकांना न्यायालयीन कामकाजासाठी वाहने पुन्हा हजर करावी लागणार आहेत.

शहरात २३ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली होती. तेव्हापासून रस्त्यावर विनाकारण वाहने रस्त्यावर अण्यास मनाई केली होती. पण अनेकजण वेगवेगळी कारणे काढून बाहेर फिरत होते. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. या काळात जवळपास 45 हजार वाहने जप्त करण्यात आली. आता ही वाहने करत देण्यास सुरू करण्यात येणार आहे. लॉकडाउनचे नियम शिथिल झाल्यामुळे वाहन परत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कामावर जाण्यासाठी नागरिकांना वाहनांची गरज असते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पोलिसांनी अनामत रक्कम घेऊन वाहने देण्यात येणार आहेत. वाहन ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत जप्त करण्यात आले आहे, तेथील पोलिस निरीक्षकाकडे चालकाने वाहन परत मिळण्याबाबत अर्ज करायचा. अर्जासोबत अनामत रक्कम पोलिसांकडे जमा करायची. त्यांनतर नागरिकांना वाहन परत दिले जाणार आहे. संबंधित वाहन न्यायालयीन प्रक्रियेसाठी जप्त करण्यात येणार नसले तरी त्यांच्यावर खटला चालविण्यात येणार आहे. त्यामुळे दाव्यात जर न्यायालयाने संबंधित चालकाला दंड सुनावला तर अनामत रक्कम परत केली जाणार नाही. त्यामुळे दंडाएवढीच रक्कम जमा करण्यात येत आहे. मात्र वाहन चालकाची चूक नसल्यास न्यायालय दंड आकारला जाणार नसून रक्कम परत केली जाणार आहे. जप्त केलेल्या वाहनांची संख्या मोठी असल्यामुळे नागरिक पोलिस ठाण्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यापाश्र्वभूमीवर वाहने परत करताना सोशल डिस्टन्सला प्राधान्य दिले जाणार आहे.

लॉकडाउन काळात जप्त केलेली वाहने परत देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यानुसार दुचाकीला अडीच हजार रुपये आणि चारचाकीला पाचहजार रुपये अनामत रक्कम घेतली जाणार आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळावे. वाहन परत घेण्यासाठी संबंधित नागरिकांनी पोलिस ठाण्यात हजर रहावे.

अनिल पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा,