पुणे : पोलिसांना धक्काबुक्की करणारा गजाआड

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन

रस्त्यावर कार आडवी लावून नागरिकाशी हुज्जत घालणाऱ्या कारचालकाला समजवण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच शिवीगाळ करुन धक्काबुक्की करणाऱ्या कारचालकाला अटक करण्यात आली. ही घटना मुंढवा येथील एबीसी रोडवर रविवारी (दि.२२) घडली.

रिकीन तुकाराम कर्णे (वय-३२ रा. तुलशीबाग कॉनली, सहकारनगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या कार चालकाचे नाव आहे. मुंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अभिजीत उगले यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
[amazon_link asins=’B00KNN4N4I’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’579c5fdc-8e6f-11e8-a1e5-15245302ecda’]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिकीन कर्णे याने एबीसी रोडवर आपली कार आडवी लावून आरडा-ओरडा करत होता. त्याला समजवण्यासाठी गेलेल्या नागरिकांशी त्याने हुज्जत घालून शांततेचा भंग केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस नाईक अभिजीत उगले आणि पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी गेले. त्यांनी रिकीन याला समजवण्याच प्रयत्न केला. मात्र, रिकीन याने उगले यांना शिवीगाळ करुन धक्का-बुक्की करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी रिकीन याचेवर गुन्हा दाखल करुन अटक केली. पुढील तपास मुंढवा पोलीस करीत आहेत.

जाहिरात