Propose Day निमित्त पुणे पोलिसांनी केली मजेशीर ‘पोस्ट’, लोकांना केलं ‘खुश’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आपला हजरजबाबीपणा आणि मजेशीर पोस्टसाठी चर्चेत असणार्‍या पुणे पोलिसांनी प्रपोज डेच्या निमित्ताने शनिवारी पुन्हा एकदा आपल्या खास शैलीत सोशल मीडिया यूजर्सला खूश केले. यानिमित्ताने मजेशीर ट्विट करताना पुणे पोलिसांनी लिहिले की, हे पुणेकर्स, आर यू ऑल वाय-फायीज? वी फील सो कनेक्टेड टू यू! (हे पुणेकरांनो काय तुम्ही सर्वजण वाय फायवर आहात? आम्हाला तुमच्याशी खुपच जोडले गेलोय असं वाटतंय) हॅशटॅग प्रपोज डे, हॅशटॅग पुणे पुलिस.

सोशल मीडिया यूजर्स या ट्विटमुळे खुपच खुश झाले आणि यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करण्यात त्यांनी सुरूवात केली. एका यूजरने लिहिले, इंडियामध्ये पुणे पोलिसच एकमेव आहेत, ज्यांना कनेक्ट होण्यास भिती वाटत नाही. दूसर्‍या यूजरने महटले, हे पुणेकर्स, काय तुम्ही वाय-फायीज आहात? हे पहा की, तुमच्याकडे डब्ल्यूपीएस2 सुरक्षा सक्षम आहे, कारण काेणी दुर्भावनापूर्ण व्यक्ती तुमचा फायदा घेऊ नये.

अन्य एका यूजरने लिहिले, व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्याची चांगली पद्धत आहे. तर आणखी एकाने म्हटले, पुणे सिटी पोलिसांसोबत लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहणेच चांगले आहे.