भिडे, मिलिंद एकबोटेसह 163 जणांना नोटीसा, कोरेगांव भिमा गावात बंदी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरेगांव भिमा शौर्य दिन दिवशी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीसांकडून पुर्ण खबरदारी घेण्यात आली असून, समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष मिलींद एकबोटे तसेच शिवप्रतिष्ठाणचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यासह 163 जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच, त्यांना 1 दिवस जिल्ह्यासह कोरेगांव भिमा परिसरात फिरण्यास बंदी घालण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोनला कोणताही प्रतिसाद दिला नाही.

कोरेगांव भिमा येथे 1 जानेवारी रोजी शौर्य दिना निमित्त विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रासह विविध राज्यातून हजारोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी जमतात. यादरम्यान, 2018 साली दंगलमय परिस्थिती उदभवली होती. अनेक वाहनांची जाळपोळ तसेच तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी मिलिंद एकबोटे, आणि संभाजी भिडे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या शौर्य दिनी पुणे ग्रामीण पोलीसांनी पुर्ण खबरदारी घेतली होती. कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे शौय दिन शांतेत पार पडला होता. यंदाही 1 जानेवारी 2020 चाही शौर्य दिनाचा कार्यक्रम शांत पध्दतीने पार पाडण्यासाठी ज्या गावात दंगलमय परिस्थिती उदभवली होती, त्या गावात जाऊन सलोख्याचे वातावरण तयार करण्यात आले आहे, जिल्हाधिकार्‍यांकडून तसे प्रयत्न केले जात आहेत. त्यामध्ये जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि ग्रामीण पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी ग्रामस्थांच्या बैठका घेत आहेत.

अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून एकबोटे आणि भिडे यांच्या सह 163 जणांना 1 जानेवारी दरम्यान कोरेगांव भिमा गावात फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/