पुण्यातील पाषाण तलावाजवळ सापडलेल्या ‘त्या’ दोन जुळ्यांची आई सापडली ! ‘या’मुळं घडलं सगळं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील पाषाण तलावाजवळ सापडलेली ती दोन जुळी जिवंत बाळांच्या निष्ठूर आई-बापांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले असून, प्रेम प्रकरणातून जन्मलेल्यामुळे त्यांना उघड्यावर टाकून दोघे पसार झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. याघटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती.

संतोष नागनाथ वाघमारे (वय 30, रा. वडगाव बुद्रुक. मुळ. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर, महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पाषाण परिसरात तलावाजवळ सहा दिवसांपुर्वी काही नागरिक कडाक्याच्या थंडीत मॉर्निंग वॉकला आले होते. त्यावेळी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास तलावाच्या काठावर गोधडीत बांधलेली दोन बाळांच्या रडण्याचा आवाज कानावर आला. त्यामुळे नागरिकांनी तेथे धाव घेतली. त्यावेळी गोधडीत पांघरलेली एक मुलगा आणि एक मुलगी अशी जुळे बाळ मिळून आले होते. नागरिकांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर चतुशृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, त्या बाळांना संरक्षणकामी प्रथम रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. तत्पुर्वी घटनेची माहिती सर्वत्र झाल्याने परिसरातील नागरिकांना याठिकाणी तोबा गर्दी केली होती. काही महिलांनी येथे येऊन या बाळांना दुध पाजले होते. त्यांच्या रडण्याच्या आवाजाने सर्वांच्या मनाचा ठाव घेतला होता.

कडाक्याच्या थंडीत गोंडस बाळ टाकून जाणार्‍या त्या निष्ठूर आई-बापांची चिड नागरिकांच्या चेहर्‍यावर दिसत होतीच, पण त्या बाळांबाबत चिंता आणि काळजीही दिसत होती.

त्यामुळे पोलिसांना या बाळांच्या आई-बापांचा शोध घेण्याचे आवाहन उभे टाकले होते. दरम्यान, पोलिसांनी परिसरातील सर्वच रुग्णालयांमध्ये जाऊन चौकशी करण्यास सुरूवात केली. त्यावेळी कर्वेनगरमधील एका रुग्णालयात घटनेच्या आधल्या दिवशी एक महिला आणि पुरूष आले होते. त्यांनी महिलेने जुळी बाळ झाली होती. त्यात एक मुलगी व मुलागा होता, असे सांगितले. परंतु, महिला रुग्णालयात काही एक न सांगता येथून निघून गेल्याचे सांगितले. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक अनिल शेवाळे व पथकातील उपनिरीक्षक मोहन जाधव आणि त्यांच्या पथकाने परिसरात महिलेचा शोध घेतला. तिचा पत्ता मिळाला. त्याठिकाणी जाऊन पाहणी केली. परंतु, तेथे सध्या राहत नसल्याचे समोर आले. त्यामुळे पुन्हा शोधा-शोध सुरू केली. त्यावेळी महिलेने चार ठिकाणचे पत्ते बदलल्याचे समोर आले. पोलिसांनी पुन्हा संबंधित पुरूषाचा शोध सुरू केला. त्यावेळी तो संतोष वाघमारे असल्याचे समजले. त्यानुसार, त्याला ताब्यात घेतले. त्याची माहिती काढून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर महिलेला ताब्यात घेतले. दोघांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली.

दोघांचे गेल्या काही वर्षांपासून प्रेम संबंध असून, त्यातून हे मुले जन्मलेली असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी गुपचूप पहाटे या मुलांना पाषाण तलावाजवळ आणून ठेवल्याचे सांगितले. दरम्यान, महिला काही एक काम करत नसून, कुटूंबियासोबत राहत नसल्याचे सांगितले. ती चांगल्या घरातील आहे. तर, आरोपी संतोष वाघमारे हा रिक्षा चालक आहे. तोही अविवाहित आहे. त्या दोघांना अटक करण्यात आली असून, न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, त्या मुलांचे आई-बाप मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पण, त्या मुलांना सध्या संस्थेत ठेवण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा –