पुण्यातील सील केलेल्या परिसरातील बँकांसाठी पोलिसांकडून नियमावली, बंद राहणार ‘या’ बँका, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना आजाराचा शहरात प्रादुर्भाव वाढत असल्याने 8 पोलीस ठाण्याच्या परिसरातील भाग “सील” करण्यात आले आहेत. तरीही या भागात रुग्ण वाढत असून यामुळे पुणे पोलिसांनी या भागातल्या बँकांसाठी नियमावली तयार केली असून, काही बँका बंद राहणार असून, काहींना वेळांचे बंधन घालण्यात आले आहे. सह पोलीस आयुक्त डॉ रवींद्र शिसवे यांनी हे आदेश काढले आहेत.

देश कोरोना आजारामुळे लॉकडाऊन आहे. राज्यात संचारबंदी लागू आहे. 14 एप्रिलनंतर शासनाने प्रादुर्भाव वाढत असल्याने आणखी 3 मे पर्यंत हा लॉकडाऊन वाढविला आहे. नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई केली आहे.

याकाळात मात्र अनेकांची कामे अडकली आहेत. सर्वच ठप्प झाले आहे. यात अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. मेडिकल, किराणा मालासोबतच बँकाचे व्यवहार सुरू आहेत शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण चिंताजनक रित्या वाढत आहेत. त्यामुळे शहरातील 8 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 27 भाग सील करण्यात आले आहेत. या भागात सर्वाधिक रुग सापडत आहेत. त्यामुळे या भागात विशेष खबरदारी घेतली जात आहे. पालिका आणि पोलीस सर्व स्थरावर प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच आता या भागातील बँकांना देखील नियम करण्यात आले आहेत.

अशी आहे नियमावली…

१)  प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व बँकांनी आपल्या शाखा बंद ठेवाव्यात. मात्र, आपले एटीएम केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू ठेवावे.

२)  अत्यावश्यक आर्थिक सेवा व शासकीय अनुदान संबंधित बँकांच्या शाखा विहित काळात चालू ठेवाव्यात.

३)  त्यासाठी जिल्हा व्यवस्थापक यांनी अग्रणी व प्रमुख बँका ठरवून व शाखा निश्चित कराव्या.

४)  या बँका ग्राहकांना सकाळी 10 ते दुपारी 1 साठी खुल्या ठेवाव्यात आणि दुपारी 2 ते 4 अंतर्गत काम सुरू ठेवावे.

५)  कर्मचाऱ्यांची संख्या कमी करावी. क्षमतेपेक्षा 40 टक्के ठेवावे.

६)  बँक प्रशासनाने या काळात नेमलेल्या कर्मचाऱ्यांना त्याबाबत आदेशाची एक प्रत द्यावी.

७)  सील भाग म्हणजेच संक्रमण भागातील शक्यतो कर्मचारी असावेत. त्यामुळे संचार करण्यास मनाई आदेशाचे पालन होईल आणि त्याचा प्रशासनाला फायदा होईल.

8)  बँकानी गर्दी टाळण्यासाठी खासगी आणि मान्यता प्राप्त सुरक्षा रक्षक यांची नेमणूक करावी.

९)  शासनाने दिलेले सर्व नियम पाळले जावे. मास्क, सॅनीटायझर, हँडगोल्ज व सामाजिक अंतर याचे पालन आवश्यक आहे.

10)  सर्व कर्मचाऱ्यांनी ओळख पत्र आयडी याकाळात बँकांकडून दिलेली प्रत जवळ ठेवावी. तसेच ग्राहकांना जास्तीत जास्त ऑनलाइन बँकिंग साठी प्रोत्साहीत करावे.