असीम सरोदे यांना दिले अचानक पोलीस संरक्षण 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पर्यावरणाच्या रक्षणासाठी उच्च-सर्वोच्च न्यायालयात लढा देणारे प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्ते असीम सरोदे यांना पोलिसांनी परवा (शनिवारी) रात्री अचानक पोलीस संरक्षण देवून आश्यर्याचा धक्काच दिला आहे.

पुण्यातील मुळा मुठा नदीच्या प्रदूषणावर त्यांनी जनहित याचिका दाखल केली होती तसेच बहुजनांच्या विशेषतः  दलितांच्या  हक्कासाठी त्यांनी अनेक खटले बड्या लोकांच्या विरोधात जाऊन लढले आहेत. यातून त्यांनी बऱ्याचं लोकांचा रोष ओढवला आहे यामुळेच हे पोलीस  संरक्षण दिले असल्याचे  सर्वत्र बोलले जाते आहे.

असीम सरोदे  यांच्या सह अन्य ४८ लोकांना महाराष्ट्र पोलिसांनी संरक्षण दिले आहे. या लोकांना संरक्षण का दिले गेले आहे या बद्दल अद्याप पोलिसांच्या कडून कोणतीही माहिती दिली गेली नाही. पोलिसांच्या या अचानक केलेल्या कृतीबद्दल समाजात आश्यर्य आणि घबराट व्यक्त केली जात आहे. तसेच असीम सरोदे यांनी तर मला पोलीस  संरक्षण  का दिले जात आहे या बद्दल मला तरी सांगावे अशा आशयाचे ट्विट केले आहे.

असीम सरोदे  यांच्या सहित अन्य ४८ जणांना संरक्षण देण्यात आले आहे त्यांच्या नावाची यादी हि पोलीस खात्या कडून जाहीर करण्यात आली नाही. आगामी निवडणुकीचा काळ ओळखून राज्यात कायदा सुव्यवस्था अव्वल राखण्यासाठीची हि एक तयारी आहे असे मत राजकीय विश्लेकांनी केले आहे .