Pune Police | महिला पोलीस अंमलदारांसाठी आनंदाची बातमी ! सोमवारपासून 8 तास ड्युटीची अंमलबजावणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Police | महिलांना शासकीय नोकरीबरोबरच कौटुंबिक जबाबदारी असा दोन्ही आघाडीवर सामना करावा लागत असतो. हे लक्षात घेऊन पोलीस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांनी महिला पोलीस अंमलदार यांना तरी किमान ८ तासांची ड्युटी द्यावी असे आदेश दिले होते. त्यानुसार या आदेशाची अंमलबजावणी राज्यातील विविध पोलीस आस्थापनांमध्ये (Pune Police) सुरु करण्यात आली आहे. पुणे शहर पोलीस दलातही सोमवारपासून सर्व महिला पोलीस अंमलदार यांना ८ तासांची ड्युटी देण्यात येणार आहे. तसे आदेश पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (Jt CP Dr. Ravindra Shisve) यांनी काढले आहेत.

सर्व प्रभारी अधिकारी यांनी स्वत: लक्ष पुरवून आपले पोलीस ठाणे/ शाखा अधिनस्त महिला पोलीस अंमलदार यांना फक्त आठ तासच ड्युटी देण्यात यावी.
त्याचप्रमाणे रात्रपाळीचे कर्तव्य नेहमीप्रमाणेच देण्यात यावे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाचे बंदोबस्त उदा़ गणेशोत्सव, ईद, मोहरम, नवरात्र, क्रिसमस,
नववर्ष, डॉ. आंबेडकर जयंती, रामनवमी, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन इत्यादी वेळी कर्तव्यासाठी कर्मचार्‍यांकडून कर्तव्याची अतिरिक्त आवश्यकता असेल
तर त्यावेळी प्रभारी अधिकारी वरील नियमात अपवाद करु शकतील.
परंतु याही दिवसांमध्ये सुविधात्मक दृष्टीकोन ठेवून महिला अंमलदारांच्या कर्तव्याच्या वेळा मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करावा.

 

या व्यतिरिक्त इतर अपवादात्मक परिस्थितीमध्ये व तात्काळ उद्भवणार्‍या घटनांमध्ये महिला अंमलदारांच्या वेळ वाढविण्यासाठी संबंधित पोलीस उपायुक्त
(Pune Police) निर्णय घेतील.
या आदेशानुसार कर्तव्य वाटप करताना स्थानिक स्तरावर कर्तव्याच्या वेळासंबंधी योग्य ती आखणी करावी.
असे आदेश डॉ. रवींद्र शिसवे यांनी काढले आहेत.

 

Web Title : Pune Police | Good news for women police officers! Execution of 8-hour duty from Monday

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

DGP Sanjay Pandey | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग, 4 डीसीपी, काही एसीपींसह 25 पोलिस अधिकारी ‘गोत्यात’, निलंबनाच्या हालचालींना वेग; जाणून घ्या प्रकरण

PM-Kisan | खुशखबर ! शेतकर्‍यांना 10 व्या हप्त्यात 2000 ऐवजी मिळू शकतात 4000 रुपये, तात्काळ जमा करा हे कागदपत्र, जाणून घ्या

Gold Price Update | पुन्हा घसरले ‘सोने’, आता 27060 रुपयात मिळतंय 10 ग्रॅम, जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचा नवीन दर