Coronavirus Lockdown : पुणे पोलिसांकडे डिजीटल पाससाठी 1 लाख नागरिकांचे अर्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात संचारबंदी काळात गरजवंतासाठी सुरू करण्यात आलेल्या डिजिटल पासेससाठी तबल 1 लाख 9 हजार नागरिकांनी अर्ज केले आहेत. पोलिसांनी मात्र पडताळणी करून यातील 50 हजार नागरिकांचे अर्ज नाकारले आहेत.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी केली आहे. पुण्यात या आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. संचारबंदीत देखील नागरिक बाहेर पडत असल्याने पुणे पोलिसांनी शहरात वाहनबंदी लागू केली आहे.

परंतु, जीवनाश्यवक सेवा, अत्यावश्यक वस्तू व नागरिकांना तातडीची आवश्यकता असल्यास बाहेर पडण्याची परवागी दिली जात आहे. त्यासाठी अडचणी शंका विचारण्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक व इमेल आयडी दिले आहेत.

पोलिसांनी नागरिकांना तात्काळ बाहेर पडणे आवश्यकत असल्यास त्यांना पोलिसांच्या www.punepolice.in या वेबसाईटवर सर्व तपशील भरून परवानगीसाठी अर्ज करावा, असे आवाहन पोलिसांनी केले होते. यात ज्यांना दररोज बाहेर पडणे गरजेचे आहे अश्यांसाठी अर्ज भरल्यानंतर पास दिला जात आहे.

या वेबसाईटवर पूर्ण तपशील व कामाची माहिती द्यावी लागते. त्यांनतर सर्व माहिती पडताळून अर्ज मंजूर झाल्यास नागरिकांना क्यूआर कोड (QR Code) असलेला एक एसएमएस पाठविला जात आहे. तो कोड दाखविल्यानंतर त्यांना सोडले जाते. यात भाजीपाला, किरणा, दूध, ग्लोसरी अशा गरजेच्या वस्तू पायी आणाव्यात. त्यासाठी पासची आवश्यकता नाही. नागरिकांनी अत्यावश्यक सुविधेसाठीच डिजीटल पाससाठी अर्ज करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

गरजू नागरिकांना मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या डिजीटल पाससाठी १ लाख 9 हजार 548 नागरिकांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी 50 हजार 933 अर्ज नाकारले आहेत. तर परवानगी दिलेल्यामध्ये गॅस संबंधित 237, बँक फायनान्स, एटीएम संदर्भात 3346 तसेच केबल, ट्रान्सपोर्ट, रेशन मिल्क, ग्रोसरी, जीवनावश्यक वस्तूंचे वाहतूक वगैरे यासाठी पास देण्यात आले आहेत. ई- कोमर्समध्ये पाहिलन्यादाच 8 हजार 300 पासेस देण्यात आले होते. मात्र, फिजिकलसाठी आता त्यांनाही पास देण्यात आले आहेत.

31 मार्च परियन्त १९ हजार ८६० जणांना डिजीटल पास दिले होते.
आता पोलिसांनी पेट्रोल पंप, गॅस वितरक,मेडिकल, बीपीओ गॅस, एलपीजी याना देखील नापास घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सर्वांना पासेस आवश्यक
पोलिसांनी सुरू केलेल्या पास हे अत्यावश्यक व्यक्तीना वेगळे होते. मात्र काही कंपन्या आणि रुग्णालये त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या लेटरहेडवर लिहून देत आहेत. त्यामुळे त्यांना अडचणी येत आहेत. दरम्यान त्यामुळे त्यांनाही हे लास घेण्याचे आवाहन करण्यात आले असून त्यांनी या लिंकवर माहिती भरून पासेस घ्यावे असे सांगण्यात आले आहे.

दरम्यान अर्जासाठी मोठ्याप्रमाणात विनंती येत आहेत. मात्र त्याला उत्तर देण्यास काही वेळ लागत आहे. तरी नागरिकांनी उशीर लागल्यास थांबावे आम्ही प्रत्येक अर्जाला उत्तर देत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.