Pune Police Health Checkup | खडकी पोलीस ठाण्यातील पोलिसांची आरोग्य तपासणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Health Checkup | कायदा सुव्यवस्थेचे (Law and Order) रक्षण करताना, गुन्ह्यांचा तपास, आंदोलने, मोर्चे, व्हीआयपींचे दौरे, रात्र गस्त यामुळे पोलिसांना (Pune Police) जास्त वेळ कर्तव्य बजावे लागते. त्यामुळे त्यांना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेता येत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करुन पोलीस अंमलदार ते अधिकारी यांच्यासाठी खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) आरोग्य शिबीराचे (Pune Police Health Checkup) आयोजन करण्यात आले होते. सिनरसिज बायो प्रा.लि. शिवाजीनगर (Synersis Bio Pvt. Ltd. Shivaji Nagar) यांच्यावतीने हे शिबीर सोमवार (दि.20) आणि मंगळवार (दि.21) या दोन दिवशी आयोजित केले होते.

आरोग्य शिबिरामध्ये खडकी पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार, अधिकारी यांच्यासह पोलीस उपायुक्त कर्यालयातील 95 पोलिसांचे रक्त तपासणी करण्यासाठी (Pune Police Health Checkup) घेण्यात आले. तसेच अधिकारी अंमलदार यांच्या वैद्यकीय तपासणीत किडनी फंक्शन, लिव्हर फंक्शन, हिमोग्रामचा आलेख तपासण्यात आला. तपासणी अहवाल प्राप्त होताच पोलीस ठाणे स्तरावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा आरोग्य तपासणी करुन मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे (Senior Police Inspector Vishnu Tamhane) यांनी दिली. विष्णू ताम्हाणे यांनी यापूर्वी समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) अशा प्रकारचे पोलिसांच्या आरोग्याबाबत वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत.

पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate),
सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे (ACP Aarti Bansode),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील
(Police Inspector Mansingh Patil) यांच्या मार्गदर्शनाखली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title :- Pune Police Health Checkup | Health checkup of police in Khadki police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kasba Peth Bypoll Election | ‘भाजपकडून शासकीय यंत्रणांचा व संस्थांचा गैरवापर’ – शरद पवार

Pune PMC Recruitments 2023 | पुणे महापालिकेत ३४० पदांची भरती प्रक्रिया सुरू;
फायरमनसह आरोग्य विभागात मोठी संधी

Pune PMC News | सिध्दार्थनगर वासियांच्या घरांसाठी सहा पर्याय;
महापालिका आयुक्तांचा प्रस्ताव