अंध महिलेला पुणे पोलिसांचा मिळाला ’भरोसा’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जमीनीसाठी वयोवृद्ध अंध मामीला त्रास देऊन जागा बळकावण्याचा प्रयत्न करणार्‍या भाच्यांना पुणे पोलिसांच्या भरोसा सेलने दणका देत आजींना आधार दिला. आजींनी मिळालेल्या आभाराने भाऊक होऊन पोलीस आयुक्तांचे आभार तर मानलेच, पण पोलिसांच्या कार्याला सलाम देखील केला.

पुणे पोलिसांनी ज्येष्ठ महिला, बालके तसेच नात्यातील वाद मिटविण्यासाठी भरोसा सेलची सुरूवात केली आहे. तत्पुर्वी ज्येष्ठ महिला दोन्ही डोळ्यांनी अंध आहे. त्या मुळच्या अक्कलकोट येथील आहेत. त्यांची गावी शेती आहे. त्या पुण्यातील हडपसर परिसरात मुलीसोबत राहतात. दरम्यान, गावाकडील जमीन त्यांनी भाच्यांना वाहन्यासाठी दिली होती. गेल्या अनेक वर्षांपासून ते मामीची शेती करत होते. परंतु, मामीच्या पाठिमागे कोणी नसल्याचा फायदा घेऊन त्यांनी तक्रारदार यांना त्रास देऊन शेती बळकावण्याचा प्रयत्न सुरू केला. अनेक दिवस हा वाद सुरू होता.

तक्रारदार यांनी याबाबत पुणे पोलिसांच्या भरोसा सेलमध्ये तक्रार केली होती. या तक्रारीची दाखल घेत ज्येष्ठ नागरिक सेलच्या वरिष्ठ निरीक्षक वैशाली चांदगुडे व कर्मचारी पुनम बारसकर यांनी त्यांचे नातेवाईक असणार्‍या भाच्चांना बोलावून घेतले. त्यांना याबाबत विचारपूस केली. तसेच, त्यांचे मार्गदर्शनकरून त्यांना कायद्याबाबत सांगितले. आपण त्रास दिल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही सांगितले. त्यावेळी त्यांनी पुन्हा त्रास देणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्या दोघांमधील वाद मिटविला. तसेच, आजींना धिर देऊन पुन्हा आनंदाने घरी पाठविले.

कोणतीही कोर्ट कचेरी तसेच कोणतेही वाद न होता हा प्रश्न इतक्या सहजपणे सुटल्याने आजींनी पुणे पोलिसांचे आभार मानले. त्यांनी पोलीस आयुक्तांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि पोलिसांच्या कार्यालयाला सलाम ठोकला.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like