Pune Police Helpline | पोलीस मदतीसाठी डायल 112 योजना ! 7 व्या मिनिटाला मिळणार पोलीस मदत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Helpline | राज्यातील नागरीकांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या मदतीसाठी एकाच क्रमांकावर सर्वप्रकारची मदत मिळावी या अनुषंगाने 112 डायल (Dial 112) ही योजना सुरू करण्यात आली. 112 डायल ही योजना पुण्यामध्ये (Pune Police Helpline) मागील 8 सप्टेंबर 2021 पासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाली. त्यामुळे नागरिकांना आता जलदगतीने सरासरी 7 मिनिटांमध्ये पोलीस मदत मिळते आहे. आधी 100 नंबर वर कॉल केला असता तक्रारदार यांचे लोकेशन (Location) कळत नसे पण, डायल 112 प्रणालीवर कॉल केला असता तक्रारदार याचे लोकेशन समजते. त्यामुळे तक्रारदार यांना तत्काळ मदत मिळते आहे.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (Joint CP Dr. Ravindra Shisve), अप्पर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर (Addl CP Dr. Jalindar Supekar) यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण कक्षात वातानुकुलित यंत्रणा, अधिकारी व पोलीस अमंलदार यांच्या बसण्याची व्यवस्था आदी बाबींचे अत्याधुनिक करणे सुरू आहे. दरम्यान, पुणे पोलीस आयुक्तालयात (Pune Police) सर्व तांत्रिक सुविधांसह सुसज्ज असे डायल 112 चे नियंत्रण कक्ष उभारलेले आहे. डायल 112 प्रणालीस जनतेकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून दररोज साधारण 300 कॉल्सची वेळेत पूर्तता करण्यात येते आहे. (Pune Police Helpline)

दरम्यान, तक्रारदार यांची तक्रारी कॉल सर्वात पहिल्यांदा नवी मुंबईतील केंद्राला (Mumbai Center) जातो. तेथे तक्रारीबाबत संपूर्ण माहिती घेऊन तो कॉल संबंधित जिल्ह्याला पाठविला जातो. तक्रार पाहून त्यावेळी तेथून जवळ असलेल्या पोलीस मार्शलला त्याची माहिती पाठविली जाते. मार्शल कॉल्सची पूर्तता करुन त्याची माहिती देतो, हि प्रक्रिया सगळी ऑनलाईनच्या माध्यमातून होते आहे.

107 टूव्हिलर, 51 फोरव्हिलर –

डायल 112 प्रणाली सुरळीत कार्यरत ठेवण्याकरीता 51 फोरव्हिलर व 107 टूव्हिलरवर असे एकूण 158 वाहनांवर डायल 112 चे डिव्हाईस बसविण्यात आले आहेत. यात 20 नवीन फोरव्हिलर वाहनांची खरेदी करण्यात आलेली आहे. याप्रणाली बाबत सहा अधिकारी आणि साधारण 500 पोलीस अंमलदार यांना पुणे व मुंबई (Pune And Mumbai) येथे प्रशिक्षण दिले गेले आहे.

Web Title : Pune Police Helpline | new police helpline numer dial 112 get police help 7th minute Pune Police News

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे हि वाचा

 

Vitamin And Mineral For Health | इम्यूनिटी, हाडे, मेंदू आणि डोळे मजबूत बनवतात व्हिटॅमिन A,B,C,D; ‘हे’ मिनरल सुद्धा आवश्यक, जाणून घ्या

Uric Acid | तुमच्या शरीरात होत असेल ‘ही’ समस्या, तर यूरिक अ‍ॅसिड वाढल्याचा असू शकतो संकेत; जाणून घ्या

Covid-19 vs Influenza | सर्दी-ताप, डोकेदुखीची लक्षणे ‘कोविड’ची आहेत की ‘फ्लू’ची, हे कसे ओळखावे? जाणून घ्या

Aloe Vera Juice Benefits | रोज प्याल एलोवेरा ज्यूस तर शरीराला होतील ‘हे’ 5 फायदे; जाणून घ्या

Maratha Reservation | उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या घरावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धडकणार ‘लाँग मार्च’ (व्हिडिओ)

Mahavikas Aghadi | राष्ट्रवादी-शिवसेनेत वादाची ठिणगी ! आघाडी न करण्याची महापौरांची भूमिका

Vistadome Coach | मध्य रेल्वेवरील ‘व्हिस्टाडोम कोच’ना प्रचंड प्रतिसाद ! गेल्या 3 महिन्यात 20,407 प्रवाशांची नोंद, उत्पन्न रु.2.38 कोटी

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 41 हजारांपेक्षा जास्त रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी