Pune Police | अवैध धंद्यांची वसुली करणे पडले महागात, पुणे शहर पोलिस दलातील कर्मचारी निलंबीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police | अवैध धंद्यांना (Illegal Trades) प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून वसुली करणाऱ्या सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील (Sinhagad Road Police Station) पोलीस हवालदार श्रीधर जनार्धन पाटील (Shridhar Janardhan Patil) यांना निलंबित (Police Suspended) करण्यात आले आहे. पाटील यांच्या निलंबनाचे आदेश पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड (DCP Purnima Gaikwad) यांनी काढले आहेत. श्रीधर पाटील यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी (Pune Police) अवैध धंद्याची वसुली बंद करण्याचे आदेश दिले होते. तरी देखील पाटील वसुली करत असल्याचे सिद्ध झाले.

सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी (Senior Police Inspector) श्रीधर पाटील यांना अवैध धंद्याची वसुली (Recovery) बंद करण्यास सांगितले होते. त्यावेळी पाटील यांनी मी हे काम कोणालाच करु देणार नाही अशी धमकी (Threat) वरिष्ठांना दिली. याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्याने पोलीस खात्याची प्रतिमा मलिन झाल्याचे आदेशात नमूद केले आहे.(Pune Police)

श्रीधर पाटील यांनी महाराष्ट्र नागरी सेवा कायद्यातील (Maharashtra Civil Service Act) नियमांचे उल्लंघन (Violation of Rules) केले आहे. त्यामुळे पुणे पोलीस (Pune Police) खात्याची प्रतिमा मलीन झाली आहे. निलंबन कालावधीत खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही. तसेच मुख्यालय (Police Headquarter) सोडता येणार नाही. मुख्यालय सोडायचे असेल तर पोलीस उपायुक्त मुख्यालय पुणे यांना अगोदर माहिती देऊन त्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. निलंबन कालावधीत दररोज राखीव पोलीस निरीक्षक (Police Inspector) यांच्याकडे हजेरी द्यावी लागेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Web Title :- Pune Police | illegal trades costly, Pune city police personnel suspended


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | खुनाच्या प्रयत्नातील फरार सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

Lathicharge On Protesters In Katraj Chowk Pune | कात्रज चौकात विविध मागण्यांसाठी आंदोलन करणार्‍यांवर पोलिसांकडून सौम्य लाठीमार

Tata IPL 2022 | …म्हणून आयपीएलचा पुण्यातील ‘हा’ सामना हलवला मुंबईला, वाचा सविस्तर

Pune PMC Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार; शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा

MNS | मनसेची आणखी एक मोठी घोषणा ! अक्षय्य तृतीयेला लाऊडस्पीकर…