Pune Police | पोलिसांच्या इमारतीसाठी 3 महिन्यानंतर स्वतंत्र जलवाहिनी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाजवळ (Police Headquarter) पर्सिस्टंट फाउंडेशनच्या (
Persistent Foundation) वतीने पोलिसांसाठी (Pune Police) कोट्यवधी रुपये खर्च करून ‘रायगड’ (raigad) व ‘शिवनेरी’ (shivneri) हे दोन २२ मजली टॉवर उभे केले आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांना (Pune Police) घरांचेही वाटप करण्यात आले. मात्र तीन महिने उलटूनही तेथे पाणीपुरवठ्याची व्यवस्थाच करण्यात आली नव्हती. त्यामुळे पोलिसांच्या कुटूंबामध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. अखेर या बहुमजली टॉवरला पाणी पुरवठ्यासाठी पोलिस व महापालिका प्रशासन यंत्रणा जागी झाली. सोमवारी सकाळपासून या टॉवरसाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली.

पोलीस मुख्यालयाजवळील दोन २२ मजली टॉवरचे काम दोन ते अडीच वर्षात पूर्ण होऊन जुलै महिन्यात या इमारतींचा ताबा पोलिसांकडे देण्यात आला. सोडत पद्धतीने पोलिसांना घराचे वाटपही केले. मात्र, तीन महिने तरी तेथे पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती.त्यामुळे घरे मिळालेल्या पोलिसांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. पाठपुरावा करूनही सातत्याने त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. अखेर सोमवारी सकाळी वरिष्ठ पोलिस अधिकारी व महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या परिसरातून स्वतंत्र जलवाहिनी नेण्यासाठी जागेची पाहणीच केली नाही तर तत्काळ यंत्रसामुग्री आणून कामासही सुरुवात करण्यात आली. मंगळवारपर्यंत ४० पाइप टाकण्यात आल्या होत्या. आणखी १५ पाइप टाकण्याचे काम सुरू आहे. परंतु , जमीनीमध्ये खडक लागल्याने या कामास आणखी काही दिवस लागण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

Thane News | द्यायची होती कोविड-19 व्हॅक्सीन पण दिली रॅबीजची लस, नर्सला करण्यात आले निलंबित

यासंदर्भात बोलताना महापालिकेच्या (Pune Corporation) पाणीपुरवठा विभागाचे (PMC Water Supply Department) प्रमुख अनिरुद्ध पावसकर (PMC Aniruddha Pawaskar) म्हणाले की, महापालिकेकडे रविवारी पाइप आल्या.
त्यानंतर तत्काळ सोमवारी पाइपलाइन टाकण्यास सुरुवात झाली आहे.
फर्ग्युसन महाविद्यालय आणि पोलिस प्रशासनाकडूनही सहकार्य मिळाले असून, येत्या दोन ते तीन दिवसांत स्वतंत्र जलवाहिनीचे काम पूर्ण होईल.

पोलीस प्रशासन (Pune Police) विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर (Addl CP Dr. Jalinder Supekar) म्हणाले, बहुमजली इमारतीसाठी सोमवारपासून स्वतंत्र जलवाहिनीच्या कामाला सुरुवात केली.
खडकाळ जमिनीमुळे पाइप टाकण्याच्या कामाला अडचण येत आहे.
मात्र, काही दिवसांतच जलवाहिनीची, तसेच इमारतीमधील राहिलेली कामे पूर्ण केली जातील.

हे देखील वाचा

Bank Holidays In October | ऑक्टोबरमध्ये 21 दिवस बंद राहतील बँका, जाणून घ्या कोणत्या राज्यात केव्हा-केव्हा बंद आहेत बँका, येथे पहा पूर्ण List

Police Raid | खंडणी वसुलीसाठी पोलिसांची छापेमारी ! 3 तरुणांना बेदम मारहाण एकाचा मृत्यू; 6 पोलीस निलंबित

BJP-MNS Alliance | ‘या’ 4 निवडणुकांमध्ये भाजप-मनसे युती होणार? शिवसेनेची चिंता वाढली?

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :Pune Police | Independent water pipeline after 3 months for police building – pmc water supply department Aniruddha Pawaskar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update