Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात निरीक्षकासह 5 पोलिसांना ‘कोरोना’ची लागण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  शहर पोलीस दलात आज एका दिवसात 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यात एका वरिष्ठ निरीक्षक आणि चार कर्मचाऱ्याचा समावेश आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

शहर पोलीस दलात नुकतीच एका दिवसात 10 पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात आज पुन्हा 5 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात एका पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. तर चार जण पोलीस कर्मचारी आहेत. दरम्यान वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील हे कर्मचारी आहेत. आता त्यांच्या संपर्कात आलेल्याना क्वारटाईन करण्यात आले आहे.

आतापर्यंत 120 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात 5 जणांची लागण झाल्यानंतर हा आकडा 125 वर गेला आहे. सर्वांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेले सर्वांची चाचणी घेण्यात येणार आहे. तसेच ते-ते पोलीस ठाणे सॅनीटाईझ करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.