पुण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोरोना पॉझिटिव्ह, संपर्कातील 27 जण क्वारंटाईन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   शहर पोलीस दलातील एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेले 27 जणांना क्वारटाईन करण्यात आले असून, त्यांची देखील तपासणी करण्यात येणार आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

शहरात कोरोनाच्या केसेस वाढत जात असताना शहर पोलीस दलात देखील कोरोनाने फैलाव सुरू केला आहे. पोलिसांकडून पूर्ण खबरदारी घेतली जात आहे. पण नागरिकांशी थेट संबंध येत असल्याने पोलिसांना कोरोना विळख्यात घेत आहे. दरम्यान नुकतीच एका दिवसात 10 पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. वेगवेगळ्या विभागात काम करणारे हे पोलीस आहेत. आतापर्यंत 120 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात आता वरिष्ठ निरीक्षकाना लागण झाली आहे. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेले जवळपास 25 ते 27 जणांना क्वारटाईन करण्यात आले आहे. तसेच ते पोलीस ठाणे सॅनीटाईझ करण्यात येईल. तसेच सर्वांची तपासणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे पोलीस दलात चिंतेचे वातावरण आहे.