120 कोटी रुपयांचे 34 किलो चरस ! ‘या’ कारणामुळे पुण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह ८ पोलीस तडकाफडकी निलंबित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – हिमाचल प्रदेशातून पुण्यात तब्बल १२० कोटी रुपयांचा चरस घेऊन आलेल्या दोघांना लोहमार्ग पोलिसांनी अटक केल्याचे प्रकरण आता पुणे लोहमार्ग पोलिसांवर चांगलेच भोवले आहे.
अमली पदार्थ प्रकरणी  केलेल्या कारवाईतील तपासात अनियमितता केल्याचा ठपका ठेवत पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ( police inspector ) सुरेशसिंग गौड यांच्यासह ८ जणांना अपर पोलीस महासंचालक (लोहमार्ग) प्रज्ञा परवदे यांनी निलंबित केले आहे. एकाचवेळी वरिष्ठ निरीक्षका ( police inspector ) सह ८ कर्मचार्‍यांना निलंबित केल्याची ही पुण्यातील पहिलीच वेळ आहे.

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशातून रेल्वेमार्गे चरस घेऊन आलेल्या दोघांना रेल्वे पोलिसांनी पकडले होते. त्यांच्याकडून ३४ किलो ४०४ ग्रॅम चरस जप्त करण्यात आला होता. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत १२० कोटी रुपये इतकी किंमत आहे. हा चरस पुणे, मुंबई, गोवा, बंगळुरु येथे नववर्षाच्या पार्टीमध्ये विक्री करण्यात येणार असल्याचे आरोपींनी सांगितले होते.

ललितकुमार दयानंद शर्मा (वय ४९, रा. भुंतर, जि़ कुलु) आणि
कौलसिंग रुपसिंग सिंग (वय ४०, रा. बंद्रोल, जि़ कुलु, हिमाचल प्रदेश)
अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
सुरुवातीला हा तपास लोहमार्ग पोलिसांकडे होता.
त्यानंतर त्याचा तपास एटीएसकडे सोपविण्यात आला.
एटीएसने त्यानंतर काही ठिकाणी कारवाई केली होती.
तपासादरम्यान लोहमार्ग पोलिसांनी अनियमितता केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.
तसेच दोघाही आरोपींना पकडण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात उशीर केला.
त्यातून आरोपींना पोलिसांवर आरोप करण्याची संधी मिळाली असल्याचे समजते.
या प्रकरणात तक्रार आल्यानंतर त्याची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांमार्फत चौकशी करण्यात आली.
त्यानंतर अपर पोलीस महासंचालक (रेल्वे) प्रज्ञा सरवदे यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार ८ जणांना निलंबित करण्यात आले आहे.

निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे –

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र गौड, पोलीस शिपाई संतोष विष्णू लाखे, माधव मारुती झेंडे, गणेश अशोक शिंदे, श्रीकांत मार्केंडय बोनाकृती, गंगाधर केशाव, अशोक अकबर गायकवाड आणि कैलास प्रकाश जाधव पोलिस दलातून निलंबन झालेल्याची नावे आहेत.

READ ALSO THIS :

तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क !

5 जून राशीफळ : आज सौभाग्य योग, 6 राशींची चांदी, होईल भरपुर लाभ, इतरांसाठी असा आहे शनिवार

मोठी कारवाई ! वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह 8 पोलीस तडकाफडकी निलंबित, राज्य पोलीस दलात प्रचंड खळबळ

Maharashtra Unlock News : ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यात सोमवारपासून ‘अनलॉक’, नियमावली जाहीर; 5 टप्प्यात होणार अंमलबजावणी, जाणून घ्या